News Flash

Bigg Boss 12 : माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल आणि अनुप जलोटा यांचं नातं माहित आहे का?

अनुप जलोटा यांची गर्लफ्रेंड त्यांच्यापेक्षा ३७ वर्षांनी लहान असून गेल्या तीन वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत.

अनुप जलोटा

स्पर्धक असो किंवा त्यांच्यातील वाद, ‘बिग बॉस’ हा रिअॅलिटी शो नेहमीच चर्चेत असतो. या शोच्या बाराव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली असून स्पर्धकांची नावं समोर आली आहेत. यंदा शोमध्ये जोडीने स्पर्धक सहभागी झाले असून सर्वाधिक चर्चेत राहिलेली जोडी म्हणजे भजन सम्राट अनुप जलोटा आणि त्यांची गर्लफ्रेंड जसलीन मथारू. अनुप यांच्यापेक्षा जसलीन ३७ वर्षांनी लहान आहे. ‘बिग बॉस १२’च्या सेटवर दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि हाच सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का ठरला.

गेल्या साडेतीन वर्षांपासून अनुप आणि जसलीन एकमेकांना डेट करत आहेत. अनुप जलोटा यांचं यापूर्वी तीन वेळा संसार मोडला आहे. त्यांची पहिली पत्नी सोनाली सेठसुद्धा त्यांची शिष्य होती. कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन जलोटा यांनी सोनाली सेठसोबत लग्नगाठ बांधली होती. ‘अनुप अँड सोनाली जलोटा’ या नावाने दोघांनी बऱ्याच म्युझिक कॉन्सर्टमध्ये परफॉर्म केलं. मात्र हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही.

Bigg Boss 12 : जाणून घ्या, ‘भजन सम्राट’ अनुप जलोटा यांच्या गर्लफ्रेंडबद्दल

घटस्फोटानंतर जलोटा यांनी बीना भाटिया हिच्यासह लग्न केलं. हे अरेंज मॅरेज होतं. मात्र त्यांचा हा संसारही काही काळ टिकला आणि ते विभक्त झाले. त्यानंतर त्यांनी मेधा गुजराल यांच्याबरोबर लग्न केलं. मेधा या माजी पंतप्रधान इंद्र कुमार गुजराल यांच्या भाची होत्या. परंतु २०१४ मध्ये त्यांचं दीर्घकालीन आजाराने निधन झालं. जलोटा आणि मेधा यांचा आर्यमान हा मुलगा आहे.

मेधा यांच्या मृत्यूनंतर अनुप जसलीनला डेट करू लागले. ‘मला भेटण्यासाठी अनुप कोलकाताला यायचे आणि आम्ही लपूनछपून एकमेकांना भेटायचो. पण आता बिग बॉसच्या घरात आम्हाला एकत्र मुक्तपणे वावरता येणार आहे,’ असं जसलीन शोच्या ग्रँड प्रिमिअरमध्ये म्हणाली.

अनुप जलोटा यांचा जन्म उत्तराखंडच्या नैनीताल इथं झाला. त्यांचे वडील पुरुषोत्तम दास जलोटासुद्धा भजन गायक होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2018 4:55 pm

Web Title: bigg boss 12 contestant bhajan singer anup jalota connection with ex pm inder kumar gujral
Next Stories
1 वेबकिंग सुमित व्यासने बांधली लग्नगाठ
2 Bigg Boss 12 : जाणून घ्या, ‘भजन सम्राट’ अनुप जलोटा यांच्या गर्लफ्रेंडबद्दल
3 गांजा,कोकेनवरुन मुंबई पोलिसांनी उडविली उदय चोप्राची खिल्ली, म्हणाले…
Just Now!
X