22 January 2021

News Flash

अनुप जलोटा-जसलीन यांनी केलं लग्न? फोटो पाहून नेटकरी अवाक्

'बिग बॉस १२'मध्ये जसलीन आणि अनुप जलोटा एकत्र दाखल झाले, तेव्हापासूनच या दोघांविषयी जोरदार चर्चा सुरू झाली होती.

‘बिग बॉस’च्या बाराव्या सिझनमध्ये सहभागी झालेले स्पर्धक जसलीन मथारू व अनुप जलोटा सध्या सोशल मीडियावर फार चर्चेत आहेत. कारण गायिका जसलीनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनुप जलोटा यांच्यासोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून या दोघांनी लग्न केलं की काय असाच प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. जसलीनने फोटोच्या कॅप्शनमध्ये फक्त अनुप यांना टॅग केलंय, त्यामुळे या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

या फोटोमध्ये जसलीन गुलाबी रंगाचा लेहंगा व भरजरी दागिनेसुद्धा परिधान केले आहेत. तिच्या हातात लाल रंगाच्या बांगड्या दिसत असून लग्नानंतर घालण्यात येणारा ‘चुडा’ असल्याचं म्हटलं जात आहे. तिच्या बाजूला भजनसम्राट म्हणून ओळखले जाणारे अनुप जलोटा हे शेरवानी, शाल आणि पगडी या वेशभूषेत पाहायला मिळत आहेत. या फोटोवर नेटकऱ्यांनी अक्षरश: प्रश्नांचा भडीमार केला आहे.

आणखी वाचा : आणखी एका अभिनेत्रीनं इस्लामसाठी बॉलिवूडला केला रामराम

‘बिग बॉस १२’मध्ये जसलीन आणि अनुप जलोटा एकत्र दाखल झाले, तेव्हापासूनच या दोघांविषयी जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र आमच्यात फक्त गुरू-शिष्याचं नातं असल्याचं दोघांनी स्पष्ट केलं. जुलै महिन्यात जसलीनने भोपाळमधील एका डॉक्टरच्या प्रेमात असल्याचा खुलासा केला होता. त्यामुळे आता तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेले हे फोटो हा पब्लिसिटी स्टंट तर नाही ना, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2020 2:02 pm

Web Title: bigg boss 12 contestant jasleen matharu shares wedding pics with singer anup jalota ssv 92
Next Stories
1 Video : ..तर मीसुद्धा सोशल मीडियाला रामराम करेन – सुयश टिळक
2 अक्षयच्या बहुप्रतिक्षित ‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर प्रदर्शित
3 प्रभास-दीपिकाच्या चित्रपटात बिग बींची एण्ट्री
Just Now!
X