तब्बल १०५ दिवस ‘बिग बॉस’च्या घरात व्यतीत केल्यानंतर विजेतेपदावर आपलं नाव कोण कोरतं याची उत्सुकता ‘बिग बॉस’च्या चाहत्यांना आहे. विजेतेपदासाठी दीपिका कक्कर, श्रीसंत, कणवीर बोहरा, रोमील चौधरी हे चार प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र आता खरी चुरस ही दीपिका आणि श्रीसंतमध्ये रंगणार आहे.
‘बॉलिवूड लाईफ’च्या वृत्तानुसार या स्पर्धेचा विजेता लीक झाला असून श्रीसंत बिग बॉस १२ चा विजेता असल्याचं मानलं जातं आहे, मात्र विजेतेपदाची अधिकृत घोषणा ही रविवारी रात्री रंगणाऱ्या फिनालेमध्ये केली जाणार आहे. घरातले अनेक स्पर्धक विरोधात असताना श्रीसंत शेवटपर्यंत या स्पर्धेत टिकून राहिला. विशेष म्हणजे ‘बिग बॉस ११’ ची विजेती शिल्पा शिंदे हिनं श्रीसंतला खुलेपणानं आपला पाठिंबा दर्शवला. बिग बॉसच्या घरातील अँग्री यंग मॅन म्हणून श्रीसंत चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. श्रीसंतची इतर स्पर्धकांच्या तुलनेत सर्वात मोठी फॅन फॉलोविंग आहे, त्यामुळे जिंकण्यासाठी या प्रचंड मोठ्या फॅन फॉलोविंगचा फायदा त्याला होऊ शकतो.
तर टेलिव्हिजनवरची ‘आदर्श सून’ म्हणून ओळखली जाणारी दीपिकादेखील विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. पहिल्यादिवसापासून तिनं उत्तम खेळी करत घरात आपलं स्थान कायम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अंतिम फेरीत या दोघांमध्ये टक्कर पाहायला मिळणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 30, 2018 6:27 pm