30 September 2020

News Flash

Bigg Boss 12: पतीची खिल्ली उडवणं थांबवा, करणवीरच्या पत्नीचं बिग बॉसला खुलं पत्र

सलमानसहित कार्यक्रमाच्या आयोजकांचं करणवीरप्रती असलेलं वर्तन पाहून करणवीरची पत्नी नाराज झाली आहे.

छोट्या पडद्यावरचा स्टार करणवीर बोहरा हा बिग बॉस १२ च्या विजेतेपदाच्या प्रमुख दावेदारापैकी एक गणला जातो. आतापर्यंत घरात स्वत:चं स्थान टिकवून ठेवण्यास यशस्वी झालेल्या करणवीरला घरातील सदस्यांकडून चुकीची वागणूक दिली जाते. इतकंच नाही खुद्द सलमानसुद्धा अनेकदा करणवीरचा अपमान करतो. सलमानसहित कार्यक्रमाच्या आयोजकांचं करणवीरप्रती असलेलं वर्तन पाहून करणवीरची पत्नी नाराज झाली आहे. म्हणूनच करणवीरची पत्नी टीजे सिद्धू हिनं बिग बॉसच्या संपूर्ण टीमला खुलं पत्र ट्विटरवर लिहिलं आहे.

यापत्राद्वारे तिनं दुटप्पी भूमिका घेणाऱ्या बीग बॉसवर ताशेरे ओढले आहे. करणवीरचा वारंवार अपमान केला जातो, त्यानं काय परिधान करावं काय नाही यावरून खोचक टोमणे त्याला मारले जातात. पण तो नेहमीच सगळ्या गोष्टींना शांतपणे उत्तर देतो. त्याच्याशी गैरवर्तन करणाऱ्या कोणत्याही स्पर्धकांवर बिग बॉस कारवाई करत नाही. अशा स्पर्धकांबाबतीत बिगबॉस नेहमीच दुटप्पी भूमिका घेतो.

यापुढे अशा प्रकारचं गैरवर्तन खपवून घेतलं जाणार नाही. करणवीर हा दोन मुलांचा पिता आहे हे देखील सगळ्यांनी लक्षात ठेवावं, असंही टिजेनं म्हटलं आहे. टीजेव्यतिरिक्त छोट्या पडद्यावरच्या अन्य कलाकारांनदेखील सलमान आणि इतर स्पर्धकांचं करणवीरप्रती असलेल्या वर्तनावर आक्षेप घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2018 2:18 pm

Web Title: bigg boss 12 karanvirs wife teejay writes an open letter to makers
Next Stories
1 लग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार
2 ‘९ पैकी ८ चित्रपटात ऐश्वर्याला माझ्यापेक्षा जास्त मानधन’
3 तिच्या खांद्यावर दीप-वीरच्या लग्नाची जबाबदारी
Just Now!
X