छोट्या पडद्यावरची आदर्श सून आणि ‘बिग बॉस’च्या १२ व्या पर्वाची विजेती दीपिका कक्करला श्रीसंतच्या चाहत्याकडून अॅसिड हल्ल्याची धमकी येत आहे. दीपिका कक्करच्या फॅन पेजवरून ही बाब मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. तसेच या पेजवरून मदतीची विनंतीही केली आहे.

दीपिका आणि श्रीसंत हे दोघंही बिस बॉसच्या अंतिम फेरीत पोहोचले. ही स्पर्धा श्रीसंत जिंकेल असं अनेकांना वाटत होतं. श्रीसंत हा पूर्वीपासूनच ‘बिस बॉस’च्या विजेते पदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र श्रीसंतला मागे टाकत अनपेक्षितरित्या दीपिकानं बाजी मारली. नव्या विजेत्याची घोषणा झाल्यापासून श्रीसंतच्या लाखो चाहत्यांनी या निकालावर आपली नाराजी व्यक्ती केली होती. खुद्द श्रीसंतच्या मॅनेजरनंही या निकालावर नाराजी व्यक्त केली.