23 September 2020

News Flash

…म्हणून काही काळासाठी देवोलीना सोशल मीडियापासून दूर!

देवोलीना झाली सोशल मीडियापासून दूर

‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतील गोपीबहू अर्थात अभिनेत्री देवोलीना भट्टचार्जीने सोशल मीडियापासून फारकत घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून देवोलीनाचा इन्स्टाग्रामवरील वावर कमी झाला असून तिने ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सोशल मीडियापासून दूर जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे.

देवोलीनाने ४ जुलै रोजी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. तर ८ जुलै रोजी तिने अखेरचं ट्विट केलं होतं. त्यानंतर ती सोशल मीडियापासून चार हात लांब असल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, देवोलीना काही काळासाठीच सोशल मीडियापासून लांब राहणार असल्याचं तिने सांगितलं आहे.

“सध्याच्या काळात मी माझा जास्तीत जास्त वेळ पुस्तकं वाचण्यात, ऑनलाइन सीरिजच, मालिका पाहण्यात घालवत आहे. तसंच या काळात मला काही तरी नवीन क्रिएटीव्ह शिकायचं आहे, त्यामुळे मी सोशल मीडियापासून काही काळ लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. मला माहित आहे,की माझ्या चाहत्यांना माझी आठवण येते. तसंच जे मला ट्रोल करतात त्यांनाही कदाचित त्या वादाची आठवण येत असेल”, असं देवोलीना म्हणाली.

पुढे ती म्हणते, “सध्या जे काही घडतंय त्या न्यू नॉर्मल परिस्थितीमुळे फारशी आनंदी नाहीये. ही गोष्टच माझ्या पचनी पडत नाही. अजूनही आपल्याला वॅक्सिनची वाट पाहत धैर्याने या सगळ्याला सामोरं जायचं आहे. आशा आहे लवकरच सगळं सुरळीत होईल”. दरम्यान, देवोलीनाला कलाविश्वात पदार्पण करुन जवळपास ९ वर्ष झाली आहेत. ‘साथ निभाना साथिया’, ‘बिग बॉस 13’ या कार्यक्रमातून ती विशेष नावारुपाला आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 11:34 am

Web Title: bigg boss 13 fame devoleena bhattacharjee takes a break from social media ssj 93
Next Stories
1 “अशा वातावरणात कॉमेडी करायची तरी कशी?”; ‘जेठालाल’ला पडला प्रश्न
2 करोना लस आणि लॉकडाउनवर बाबू भय्यांची भन्नाट चारोळी, म्हणे…
3 ‘थप्पड’चे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचा बॉलिवूडला रामराम
Just Now!
X