14 August 2020

News Flash

‘बिग बॉस’फेम हिमांशी खुरानाने केली करोना चाचणी? जाणून घ्या सत्य

...म्हणून हिमांशीने केली करोना चाचणी

चीनपासून उद्रेक झालेल्या करोना विषाणूने देशात थैमान घातलं आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत आतापर्यंत अनेकांना करोनाची लागण झाली आहे. अलिकडे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह कुटुंबातील काही जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यांच्याप्रमाणेच छोट्या पडद्यावरील काही कलाकारांनाही करोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं त्यातच आता ‘बिग बॉस 13’ फेम हिमांशी खुरानाने करोना चाचणी केली आहे.

हिमांशी गेल्या दोन दिवसांपासून आजारी असल्यामुळे तिने करोना टेस्ट केल्याचं तिच्या मॅनेजरने ट्विट करत सांगितलं होतं. हेच ट्विट हिमांशीने रिट्विट करुन खरंच तिची तब्येत बरी नसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

“गेल्या २ दिवसांपासून हिमांशीची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे तिने करोना टेस्ट करुन घेतली आहे. सध्या आम्ही रिपोर्टची वाट पाहत आहोत. ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. त्यामुळे आमच्या कुटुंबीयांना आणि मित्र-परिवाराला मेसेज करणं थांबवा. सुरक्षित रहा. धन्यवाद”, असं ट्विट हिमांशीच्या मॅनेजरने केलं होतं.


हिमांशीने मॅनेजरचं हेच ट्विट पुन्हा रिट्विट केलं आहे. ‘रिपोर्ट शेअर करुन’, असं तिने म्हटलं आहे. तिच्या या ट्विटनंतर अनेकांनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 9:22 am

Web Title: bigg boss 13 fame himanshi khurana undergone corona virus test slams fake rumours ssj 93
टॅग Coronavirus
Next Stories
1 कतरिना कैफविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?
2 हिंदुस्थानी भाऊची एकता कपूर विरोधात तक्रार; वेब सीरिजमधील सीनवर घेतला आक्षेप
3 “केलेल्या पापांची याच जन्मात फळं भोगावी लागतील”; अभिनेत्याने केली सलमानवर टीका
Just Now!
X