29 May 2020

News Flash

Video : अनोख्या थीमवर साकारलेले ‘बिग बॉस १३’चं आलिशान घर

यंदाच्या थीमनुसार घरामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत

बिग बॉस १३

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो ‘बिग बॉस’चं १३ वं पर्व लवकरच सुरु होणार आहे. ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम अनेकांच्या आवडीचा असल्यामुळे प्रत्येक जण या शोविषयीच्या लहानसहान गोष्टीदेखील जाणून घेण्यास उत्सुक असतो. त्यातच प्रत्येक पर्वामध्ये बिग बॉसचं नवीन घरं हे आकर्षणाचं केंद्रबिंदू असतं. त्यामुळे यंदाच्या पर्वामध्ये कोणत्या थीमवर घराची रचना करण्यात आली आहे याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. फिल्मसिटीमध्ये ‘बिग बॉस १३ ‘च्या घराचा सेट उभारण्यात आला असून त्याची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.

सलमानच्या सूत्रसंचालनाने सजलेला हा शो २९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील या शोची थीम वेगळी असणार आहे. १८ हजार ५०० स्क्वेअर फूटाच्या जागेमध्ये हा सेट उभारण्यात आला असून यंदा या घराला संग्रहालयाचं स्वरुप देण्यात आलं आहे. या घरामध्ये ९३ कॅमेरा बसविण्यात आले आहेत.  यंदा या शोमध्ये १४ स्पर्धक सहभागी होणार असून त्यांना १०० दिवस या घरामध्ये रहायचं आहे.

यंदाच्या थीमनुसार घरामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे अनेक रंगांचा वापर करुन हे घर निरनिराळ्या रंगांनी सजविण्यात आलं आहे. गार्डन एरियामध्ये हिरवं गवत पसरलं असून लिव्हिंग एरियामध्ये फ्लोरोसेंट आणि गुलाबी या रंगाचा सर्वाधिक वापर करण्यात आला आहे. १४ लोकांसाठी बेडरुममध्ये झोपण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र तीन जणांना एक बेड शेअर करावा लागणार आहे. विशेष म्हणजे यावेळी शक्यतो इको-फ्रेंडली वस्तूंचा वापर करुन हे घर सजविण्यात आलं आहे. यात प्लास्टिकचा वापर कटाक्षाने टाळला आहे.

दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून ‘बिग बॉस’च्या घरामध्ये सेलिब्रिटींप्रमाणे सामान्य जनताही सहभागी होऊ शकत होती. मात्र यंदा केवळ सेलिब्रिटीचं सहभागी होऊ शकतात. यावेळी या घरामध्ये अभिनेता सिद्धार्थ शुक्ला, देबोलिना भट्टाचार्य, रश्मी देसाई, दलजीत कौर, शिविन नारंग, आरती सिंह यासारखे कलाकार सहभागी होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2019 3:55 pm

Web Title: bigg boss 13 house turned into a museum ssj 93
Next Stories
1 मेट्रो तर हवीय पण आरेच्या सद्य स्थितीतल्या जंगलासह- पुष्कर श्रोत्री
2 ‘अशी ही बनवाबनवी’च्या ‘शंतनू’बद्दल हे वाचून तुम्हाला धक्का बसेल
3 ‘माहेरची साडी’ चित्रपटासाठी अलका कुबल नव्हे तर ‘या’ अभिनेत्रीला होती पहिली पसंती
Just Now!
X