‘बिग बॉस १३’ चं यंदाचं पर्व चांगलंच गाजताना दिसत आहे. हा शो रोज नवनवीन गोष्टींमुळे चर्चेत येत आहे. त्यातच या शोची थीम, टास्क यामुळे घरामध्ये रोज नवीन वाद रंगताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या पर्वामध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या जास्त आहे. मात्र या साऱ्या महिला स्पर्धक स्ट्राँग आणि फॅशनच्या बाबतीत तितक्याच सजग असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र यंदाच्या पर्वामध्ये सहभागी झालेल्या एका अभिनेत्रीने बिकिनी घालण्यास मनाई केली आहे.

मागच्या पर्वामध्ये (पर्व १२) जसलीन मथारू ही तिच्या हॉटनेस आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत आली होती. त्यामुळे १२ वं पर्व विशेष चर्चिलं गेलं होतं. मात्र यंदाच्या पर्वामध्ये हे चित्र काहीसं वेगळं आहे. बिग बॉसच्या घरामध्ये सहभागी झालेली माहिराने बिग बॉस सुरु होण्यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये स्पष्टपणे शोमध्ये बिकिनी घालणार नसल्याचं सांगितलं होतं.

‘मी बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर बिकिनी घालणार नाही. मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये कधीही ऑनस्क्रीन बिकिनी घातली नाही. मी अशा कपड्यांमध्ये ऑनस्क्रीन कंम्फर्टेबल नसते आणि मला माझ्या कुटुंबियांकडून याबाबत परवानगीही नाही’, असं माहिराने या मुलाखतीत सांगितलं होतं.

 

View this post on Instagram

 

only we know

A post shared by Mahira Sharma (mau) ماهرة (@officialmahirasharma) on


पुढे ती म्हणते, ‘आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो तिथे फ्लर्टींग वैगरे सारख्या गोष्टी सर्रास होतात. तेच बिग बॉसच्या घरात गेल्यानंतरही कदाचित होईल. मात्र बिग बॉसच्या घरात प्रेम वैगरे होणं शक्य नाही. त्यामुळे या घरात गेल्यानंतर ‘नो बॉयफ्रेंड’ हे मी आधीच क्लिअर केलं आहे’. दरम्यान, माहिरा पंजाबमधील एक लोकप्रिय मॉडेल आहे. त्यासोबतच टिक-टॉकवर देखील तिचा प्रचंड मोठा फॅनफॉलोवर्स आहे. इतकंच नाही तर ती ‘कुंडली भाग्य’ आणि ‘नागिन ३’ मध्येही झळकली आहे.