08 March 2021

News Flash

‘बिग बॉस १३’ फेम पारस-माहिराने केलं लग्न? पाहा फोटो

पारसने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले फोटो

पारस-माहिरा

‘बिग बॉस’चा तेरावा सिझन नुकताच संपला असून या सिझन सर्वांत वादग्रस्त ठरला होता. या सिझनमधील पारस छाब्रा आणि माहिरा शर्मा ही जोडी फार चर्चेत होती. हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. मात्र आता अचानक त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे ‘बिग बॉस’ संपल्यानंतर लगेचच पारस-माहिराने लग्नगाठ बांधली का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

या फोटोंमध्ये माहिरा पांढऱ्या गाऊनमध्ये तर पारस हिरव्या रंगाच्या कोटमध्ये पाहायला मिळत आहे. पारसने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो पोस्ट केले आहेत. लग्नाच्या पोशाखातील दोघांचे हे फोटो पाहून चाहत्यांनी त्यांना शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत. लग्नाच्या चर्चांना उधाण आलं असतानाच पारस-माहिराने फक्त फोटोशूट केल्याचंही म्हटलं जात आहे. तर एका म्युझिक व्हिडीओसाठी या दोघांनी लग्नाचा पोशाख परिधान केलंय असंही म्हटलं जात आहे.

माहिरा शर्मा काही दिवसांपूर्वी बोगस पुरस्काराच्या वादामुळे चर्चेत आली होती. ‘बिग बॉसमधील मोस्ट फॅशनेबल कन्टेस्टंट’चा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याचं तिने इन्स्टाग्रामद्वारे सांगितलं. मात्र आम्ही असा कोणता पुरस्कार दिलाच नव्हता असं पुरस्कार सोहळा आयोजकांनी स्पष्ट केलं. त्यामुळे माहिराने पुरस्काराची खोटी माहिती चाहत्यांना दिल्याची चर्चा होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 12:57 pm

Web Title: bigg boss 13 paras chhabra and mahira sharma stun in wedding attire see pics ssv 92
Next Stories
1 तू मुस्लिम धर्म स्वीकारलास का? नेटकऱ्यांनी केलं उर्वशी रौतेलाला ट्रोल
2 ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या जागी येणार ‘ही’ मालिका
3 ‘ही’ चिमुकली आहे लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याची पत्नी
Just Now!
X