News Flash

जाणून घ्या,बिग बॉसच्या घरात येणारा अली गोणी आहे तरी कोण?

अली गोणी कोण माहित आहे का?

सध्या छोट्या पडद्यावर गाजत असलेला शो म्हणजे बिग बॉस १४. यंदाच्या पर्वातमध्ये अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी सहभागी झाली आहेत. त्यामुळे रोज या शोमध्ये नवनवीन किस्से, टास्क रंगत असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच आता लवकरच या घरात वाइल्ड कार्डच्या माध्यमातून नव्या सदस्यांची एण्ट्री होणार आहे. यातलं एक नाव म्हणजे अभिनेता अली गोणी.

‘ये हैं मोहब्बते’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अली लवकरच बिग बॉस १४ मध्ये दिसणार आहे. अलिकडेच त्याने सोशल मीडियावर जास्मीनसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. पुन्हा एकदा खेळण्यास सज्ज होऊयात. पण यावेळी रंगणारा खेळ थोडा वेगळा असेल, असं कॅप्शन अलीने या फोटोला दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

Chal ek baar phir khelte hai par iss baar game thoda different hai @jasminbhasin2806

A post shared by (@alygoni) on

अली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता असून त्याने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. एमटीव्ही स्प्लिट्स व्हिलामधून त्याने कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर तो ‘ये है मोहब्बते’, ‘कुछ तो है तेरे मेरे दरमियाँ’, ‘ये कहां आगाए हम’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.
दरम्यान, मालिकांसोबतच अली अनेक रिअॅलिटी शोमध्ये देखील झळकला आहे. यात ‘खतरों के खिलाडी ९’ , ‘नच बलिये ९’ या शोमुळे त्याची सर्वाधिक चर्चा झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 10:42 am

Web Title: bigg boss 14 contestant aly goni photos videos dcp 98
Next Stories
1 Birthday Special : ‘या’ अभिनेत्यासोबत तब्बू होती दहा वर्षे रिलेशनशीपमध्ये
2 चित्रपट महामंडळाला बदनाम करणाऱ्यांवर लवकरच कारवाई
3 ‘त्या’ तिघी सध्या काय करताहेत..?
Just Now!
X