News Flash

Bigg Boss 14 : स्पर्धक करू शकणार मॉलमध्ये शॉपिंग, पाहू शकणार थिएटरमध्ये सिनेमा

लॉकडाउनमध्ये ज्या ज्या गोष्टी सामान्यांना करता आल्या नाहीत, त्या सर्व गोष्टी आता स्पर्धकांना करायला मिळणार आहेत.

पण याचा सलमानच्या करिअरवर परिणाम झाला नाही. आज सलमानचे चित्रपट १०० कोटींहून अधिक कमाई करताना दिसतात.

छोट्या पडद्यावरील सर्वांत वादग्रस्त व तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चा चौदावा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी करोनाच्या प्रादुर्भावामुळे सिझनमध्ये कोणकोणते बदल घडणार, स्पर्धकांना कोणते नवीन व अनोखे टास्क देण्यात येणार याबद्दलची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. यासाठी बिग बॉसच्या टीमने बरीच मेहनत घेतली असून लॉकडाउनमध्ये ज्या ज्या गोष्टी सामान्यांना करता आल्या नाहीत, त्या सर्व गोष्टी आता स्पर्धकांना बिग बॉसच्या घरात करायला मिळणार आहेत. यंदाच्या सिझनचं सूत्रसंचालन सलमान खानच करणार असून ३ ऑक्टोबरपासून हा शो टीव्हीवर प्रसारित होणार आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या माहितीनुसार, बिग बॉस १४ च्या स्पर्धकांना टास्कनिमित्त बाहेरचे खाद्यपदार्थ खायला, मॉलमध्ये फिरायला आणि थिएटरमध्ये सिनेमा पाहायला मिळणार आहे. पण हे सर्व कसं शक्य होणार ते अद्याप स्पष्ट केलेलं नाही. मात्र वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी आणि घरी बसलेल्यांसाठी यंदाचे एपिसोड्स म्हणजे मनोरंजनाची पर्वणी नक्कीच ठरेल.

कोण आहेत बिग बॉस १४ चे स्पर्धक?

निया शर्मा, पवित्रा पुनिया, आकांक्षा पुरी, निशांत मलकानी, एजाझ खान, नैना सिंह, कुमार जानू आणि विवियन डिसेना हे स्पर्धक यंदाच्या सिझनमध्ये दिसू शकतात. तर अध्ययन सुमन, चाहत पांडे, दिग्दर्शक ओनिर आणि मॉडेल व अभिनेता राजीव सेन यांनी बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची संधी नाकारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 10:03 am

Web Title: bigg boss 14 contestants will get to shop eat out watch movies in theatres ssv 92
Next Stories
1 Birthday Special : ‘इशारो इशारो में’पासून ते ‘कतरा कतरा’पर्यंत आशा भोसलेंचा सुरेल संगीतमय प्रवास
2 ‘भाभीजी घर पर हैं’ मालिकेचे निर्माते संजय कोहली करोना पॉझिटिव्ह
3 ‘ये है आशिकी’फेम अभिनेत्याला करोनाची लागण
Just Now!
X