News Flash

एजाज-पवित्रा बिग बॉसमुळे आले एकत्र, सीझन संपायच्या आत सुरु झाली लग्नाची तयारी?

एजाज आणि पवित्रा यांच्या जोडीने यंदाचे पर्व गाजवले आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजेच बिग बॉस. बिग बॉसचे हे १४ वे पर्व आहे. बिग बॉसच्या प्रत्येक पर्वात स्पर्धकांमधील प्रेम प्रकरण हे चर्चेचा विषय असतो. यंदाच्या पर्वात अभिनेता एजाज खान आणि अभिनेत्री पवित्र पुनिया यांच्या प्रेम प्रकरणाने पर्व गाजवलं आहे. पवित्रा शोमधून बाहेर गेल्यानंतर या दोघांचा रोमान्स टीव्हीवर दिसला नसला तरी एजाजचे पवित्रावर किती प्रेम आहे या बद्दल तो सतत शोमध्ये बोलायचा. एजाज त्याच्या एका प्रोजेक्टसाठी बिग बॉसमधून बाहेर पडला. बिग बॉसच्या घराबाहेर पडताच एजाजने पवित्राच्या भावाची भेट घेतली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत एजाजने यावर वक्तव्य केलं आहे. एजाज खान म्हणाला, “आमचं नात इथून नक्कीच पुढे जाणार आहे. पण आम्ही घाई करणार नाही. कारण या सगळ्या गोष्टी शेवटपर्यंत नेण्यासाठी एकमेकांसोबत बराच वेळ राहणे गरजेचे आहे. जेव्हा मी पहिल्यांदा तिच्या घरी गेलो तेव्हा मी तिच्या भावाला भेटलो. तिच्या कुटुंबीयांना भेटून सगळ्या गोष्टी समोरासमोर बोलण गरजेच आहे.”

आणखी वाचा- साडेचार वर्षांची असताना माझे आई-वडील विभक्त झाले, काजोलने सांगितल्या लहानपणीच्या आठवणी

“खरं सांगायचं झालं तर, बिग बॉसच्या घरात असताना मी खूप घाबरलो होतो. एखादी व्यक्ती समोरच्याला न ओळखता त्याच्याबद्दल स्वत: एक मत तयार करते” असे एजाज हसत म्हणाला.

आणखी वाचा- Bigg Boss 14: निक्की तांबोळीने देवोलीनाची उडवली खिल्ली

पुढे तो म्हणाला, “आमच्या नात्याबद्दल अनेक चुकीच्या गोष्टी बोलण्यात आल्या आहेत. मी शोमध्ये असताना माझ्या भावाने पवित्राची भेट घेतली. देवाच्या कृपेने आता सर्वकाही ठिक होईल. आमचे एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही एकमेकांचा आदर करतो. मला माझे खाजगी आयुष्य खासगीच ठेवायचे आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 3:56 pm

Web Title: bigg boss 14 eijaz khan meet pavitra punia brother actor says everything will be fine dcp 98 avb 95
Next Stories
1 टायगर श्रॉफच्या बहिणीने वाढदिवशी शेअर केला बिकिनी फोटो, आई म्हणाली..
2 साडेचार वर्षांची असताना माझे आई-वडील विभक्त झाले, काजोलने सांगितल्या लहानपणीच्या आठवणी
3 ५० लाख रुपयांच्या प्रश्नाला स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्ही देऊ शकाल का उत्तर?
Just Now!
X