News Flash

VIDEO: बिग बॉसच्या घरावरही करोना इम्पॅक्ट; पाहा कसं असणार यंदाचं घर…

बिग बॉसचं घर यंदा कसं असेल? पाहा थक्क करणारा व्हिडीओ..

‘बिग बॉस’ हा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. त्यामुळे प्रेक्षकही दरवर्षी या शोची आतुरतेने वाट पाहात असतात. वेगवेगळ्या गोष्टींसाठी हा रिअॅलिटी शो कायमच चर्चेत असतो. या घरात कोणाला प्रवेश मिळणार? यंदाची थीम काय असणार? याबाबतच्या चर्चांना अनेकदा उधाण येत. त्यातच आता ‘बिग बॉसचं १४ वं पर्व येत्या ३ ऑक्टोंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. दरम्यान यंदाच्या पर्वात ‘बिग बॉस’चं घर आतुन कसं असेल? याची एक झलक कलर्स वाहिनीने दाखवली आहे. त्यांनी घराचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे यंदाच्या वर्षी बिग बॉसच्या घरात मॉल, स्पा आणि चित्रपटगृह देखील असेल.

अवश्य पाहा – बिग बॉस १४ मध्ये झळकणार ग्लॅमरस पवित्रा; ७ दिवसांसाठी मिळणार लाखो रुपयांचं मानधन

अवश्य पाहा – भूमी पेडणेकर म्हणते, “…तर हा अभिनेता असता ‘सेक्स उपचार तज्ज्ञ’

अवश्य पाहा – “प्यार एक धोका हैं…” अभिनेत्रीला प्रियकराने फसवलं: दुसऱ्याच तरुणीबरोबर केलं लग्न

‘बिग बॉस १३’ च्या पर्वामध्ये विचित्र जोडी ही थीम ठेवण्यात आली होती. हे पर्व विशेष गाजलंही होतं. त्यामुळे यंदाच्या नव्या पर्वाची थीम कोणती असावी? याविषयी शो मेकर्समध्ये प्रचंड चर्चा रंगली. या चर्चेअंती यंदाची थीम सोशल डिस्टंसिंग असावी असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर ‘बिग बॉस १४’च्या पर्वामध्ये सोशल डिस्टंसिंग ही थीम पाहायला मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप याविषयी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 4:17 pm

Web Title: bigg boss 14 house inside video mppg 94
Next Stories
1 “अनुराग खोटं बोलतोय”; पायल घोषने केली पॉलिग्राफ टेस्टची मागणी
2 शुभंकर तावडे करणार ‘दिल दोस्ती दुनियादारी’; साकारणार ‘ही’ भूमिका
3 शाहरुख खानला मारलं म्हणून गुलशन ग्रोव्हर यांना ‘या’ देशाने नाकारला व्हिसा
Just Now!
X