News Flash

अभिनेत्रीचं फ्लर्टिंग पाहून सलमान खानला फुटला घाम; पाहा व्हिडीओ…

'बिग बॉस'च्या घरात ग्लॅमरस निक्कीची एण्ट्री

‘बिग बॉस’ हा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून ओळखला जातो. चित्रविचित्र टास्क आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमुळे हा शो नेहमीच चर्चेत असतो. यंदाच्या १४ व्या पर्वातही पवित्रा पुनिया, जॅस्मिन भसिन यांसारख्या अनेक ग्लॅमरस तरुणी या शोमध्ये पाहायला मिळतील. परंतु यांपैकी निक्की तंबोली ही अभिनेत्री मात्र सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तिचं फ्लर्टिंग पाहून बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला देखील घाम फुटला.

अवश्य पाहा – कोटी कोटींची उड्डाणे… ‘बिग बॉस’च्या आशीर्वादाने करोडपती झालेले सेलिब्रिटी

अवश्य पाहा – शाहरुख खानला मारलं म्हणून गुलशन ग्रोव्हर यांना ‘या’ देशाने नाकारला व्हिसा

‘बिग बॉस’चा १४ वा सीझन सुरु व्हायला आता काही तासांचा अवधी उरला आहे. दरम्यान कलर्स वाहिनीने या शोचं आणखी प्रमोशन करण्यासाठी एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री निक्की तंबोली चक्क सलमान खानसोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. “मला पुरुषांसारखं फ्लर्ट करता येत नाही पण या शोमध्ये येण्यासाठी ही कला मी अवगत करण्याचा प्रयत्न केला आहे.” असं म्हणत तिने सलमान सोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला. तिचं हे वाक्य ऐकून सलमान जोरजोरात हसू लागला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ‘बिग बॉस’चे चाहते या व्हिडीओवर गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 1:11 pm

Web Title: bigg boss 14 nikki tamboli flirt with salman khan mppg 94
Next Stories
1 आणखी काय पोचपावती हवी?; राज ठाकरेंच्या ट्विटवर केदार शिंदेंचा रिप्लाय
2 “देवाचं रुप हे सोनू सूदसारखंच असेल”; चाहत्याच्या स्तुतीवर अभिनेता भावूक
3 ‘…तो आनंद सापडेल’; केदार शिंदेंच्या नव्या मालिकेसाठी राज ठाकरे उत्सुक
Just Now!
X