News Flash

“हा शो आता कंटाळवाणा झालाय”; माजी स्पर्धकांची ‘बिग बॉस’च्या नावानं बोंब

"हा शो केवळ निकी तांबोळीचा नाही"; अभिनेत्रीने उडवली 'बिग बॉस'ची खिल्ली

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या १४ व्या सीझनला मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली. हा शो सुरु होऊन आता एक आठवडा उलटून गेला आहे. शोमधील प्रत्येक स्पर्धक मोठ्या जिद्दीने ‘बिग बॉस’च्या घरात टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु यंदाच्या स्पर्धकांवर बिग बॉसची माजी स्पर्धक काम्या पंजाबी नाराज आहे. गेल्या १३ वर्षांच्या तुलनेत १४ व्या सीझनमधील स्पर्धक काही कंटाळवाणे आहेत अशी टीका तिने केली आहे.

अवश्य पाहा – “गटार स्वच्छ होतंय तर यांना त्रास काय?”; याचिका दाखल करणाऱ्यांवर कंगना संतापली

अवश्य पाहा – पहिल्याच आठवड्यात ‘ही’ अभिनेत्री ‘बिग बॉस’मधून बाहेर

मला हे सर्वच कलाकार खुप कंटाळवाणे वाटतायेत. कलर्स वाहिनीने काहीतरी करावं. ही मंडळी रोज एकाच मुद्द्यावर भांडतात. या शोमध्ये आता कुठल्याही प्रकारचं मनोरंजन दिसत नाही. अशा आशयाचं ट्विट करुन काम्याने यंदाच्या बिग बॉस स्पर्धकांवर टीका केली आहे. तिच्या या मागणीला अभिनेत्री प्रिया मलिक हिने पाठिंबा दिला आहे. “हा केवळ निक्की तांबोळीचा शो नाही आहे. शहजाद, जान, निशांत, राहुल, अभिनव या कलाकारांनी देखील काहीतरी करावं.” असा उपरोधिक टोला तिने लगावला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या दोन्ही अभिनेत्री बिग बॉसच्या माजी स्पर्धक आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांची ही ट्विट्स सध्या बिग बॉस चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 1:26 pm

Web Title: bigg boss 14 priya malik kamya punjabi nikki tamboli mppg 94
Next Stories
1 करोना रुग्णांची सेवा करणाऱ्या अभिनेत्रीलाच करोनाची लागण
2 आदिपुरुष चित्रपटात अजय देवगण दिसणार ‘या’ भूमिकेत?
3 काजल अगरवालच्या साखरपुड्याचा फोटो; होणाऱ्या पतीने केला पोस्ट
Just Now!
X