News Flash

म्हणून राहुल वैद्यने मागितली जान सानूची माफी

जाणून घ्या नेमकं काय झालं होतं.

सध्या छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो बिग बॉसचे १४वे पर्व चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात भांडणे, प्रेम, फ्रेंडशीप हे सर्व पाहायला मिळत आहेत. दरम्यान नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये राहुल वैद्यने घराणेशाही हा मुद्दा उचलत जान सानूला नॉमिनेट केले होते आणि त्यावरुन घरातील स्पर्धकांमध्ये जोरदार भांडण सुरु झाले होते. पण आता राहुलले जानची माफी मागितली आहे.

शोमध्ये राहुल वैद्य आणि जान यांच्यामध्ये गैरसमज झाला होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले होते. पण त्यानंतर रेड झोनमध्ये गेल्यावर त्यांच्यामधील गैरसमज दूर झाले आहेत. राहुलने जानची माफी मागतली आहे. आता त्या दोघांमध्ये चांगले मैत्रीचे नाते असल्याचे पाहायला मिळते.

काय म्हणाला होता राहुल?

‘मी जानला नॉमिनेट करु इच्छितो. कारण मला घराणेशाहीचा प्रचंड राग येतो. बिग बॉसच्या घरात जितके स्पर्धक सहभागी झाले आहेत त्यांनी स्वत: मेहनत करुन घरात एण्ट्री मिळवली आहे. पण जानला घरात त्याच्या वडिलांमुळे एण्ट्री मिळाली आहे. त्याची स्वत:ची अशी ओळख नाही’ असे राहुल बोलताना दिसला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 6:11 pm

Web Title: bigg boss 14 rahul vaidya apologizes to john kumar after nepotism controversy avb 95
Next Stories
1 ‘बिग बॉस नाही पाहत म्हणून स्वत:ला…’, बबिताने व्यक्त केला संताप
2 “वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा
3 अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचे नाव बदलताच मुकेश खन्ना यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Just Now!
X