06 March 2021

News Flash

हद्द झाली! कॅमेरासमोरच राखीने फाडले अभिनवचे अंतर्वस्त्र

...म्हणून राखीने फाडले अभिनवचे अंतर्वस्त्र

‘बिग बॉस’ या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी झालेली राखी सावंत सातत्याने चर्चेत येत आहे. कधी तिच्या अतरंगी वर्तणुकीमुळे तर कधी तिच्या चित्रविचित्र बोलण्यामुळे. अलिकडेच झालेल्या भागात राखीने राहुल वैद्य आणि अली गोणी या दोघांना आंघोळ घालायला सांगितली होती. त्यामुळे सोशल मीडियावर तिला बरंच ट्रोल व्हालं लागलं होतं. मात्र, आता राखीने पुन्हा एकदा पुन्हा हद्द पार केली आहे. थेट कॅमेरासमोर जात तिने अभिनव शुक्लाचे अंतर्वस्त्र फाडले आहेत.

‘बिग बॉस’मध्ये सहभागी झाल्यानंतर राखीची अभिनव शुक्ला आणि रुबिना दिलैक यांच्यासोबत चांगली मैत्री झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, आता राखीने अभिनवच्या प्रेमात पडल्याचं नाटक करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच एका सायकल टास्कदरम्यान अभिनवने राखीला मदत करण्यास नकार दिला. त्यामुळेच रागाच्या भरात राखीने अभिनवचे अंतर्वस्त्र फाडले आहेत.


सायकल टास्कमध्ये अभिनव आणि राखी दोघेही विरुद्ध टीममध्ये खेळत होते. यावेळी राखीने अभिनववर प्रेम असल्याचं सांगत त्याला टास्कमध्ये मदत करण्याची विनंती केली. मात्र, अभिनवने त्याच्या टीमची बाजू घेत टीम सोडून प्रतिस्पर्धीला मदत करणार नसल्याचं थेट सांगितलं. या प्रकारानंतर राखीने थेट अभिनवच्या कपड्यांमधील त्याचे अंतर्वस्त्र घेतले आणि ते कॅमेरासमोर जाऊन फाडले.

आणखी वाचा- असीमने दिला बिग बॉस १४ला नकार?

दरम्यान, राखीचं हे वर्तन प्रेक्षकांना अजिबात पटलेलं नाही. अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र डागण्यास सुरुवात केली आहे. सध्या राखी सातत्याने प्रकाशझोतात राहण्याचा प्रयत्न करत आहे. मध्यंतरी तिने अभिनववर प्रेम असल्याचं सांगत संपूर्ण अंगावर त्याचं नाव लिहून घेतलं होतं. मात्र, आता राखीच्या या वागण्यामुळे अभिनव आणि रुबिना कंटाळल्याचं दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2021 1:48 pm

Web Title: bigg boss 14 rakhi sawant cutting abhinav shuklas underwear on national television ssj 93
Next Stories
1 म्हणून ट्रेडमिलवर अक्षय कुमार चालला चक्क २१ किमी? जाणून घ्या कारण
2 शरीरावरील ‘त्या’ व्रणांमुळे मलायका झाली ट्रोल
3 ‘इनिग्मा – द फॉलन एंजल’ची गरुडझेप; आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होतीये चर्चा
Just Now!
X