छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस.’ बिग बॉसच्या घरातील प्रत्येक स्पर्धक प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत असल्याचे दिसत आहेत. पण सर्वांचे लक्ष ड्रामा क्वीन राखी सावंतने वेधून घेतले आहे. राखीने या शोमध्ये तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल उघडपणे सांगितले आहे.
बिग बॉसमधील स्पर्धक सोनाली फोगाटशी बोलताना राखीने आणखी एक खुलासा केला आहे. “मला आई होण्याची इच्छा असून मी माझे बीज फ्रोजन केले आहेत. पण आता मला स्पर्म डोनरची गरज आहे. अभिनवने त्याचे स्पर्म डोनेट करायला हवेत. शो मधून बाहेर गेल्यावर मी अभिनव, रूबीना आणि त्यांच्या कुटूंबीयांशी बोलणी करेन जेणे करून अभिनव डोनर बनेल आणि मी आई होईल” असे राखी म्हणाली.
View this post on Instagram
२०१९ मध्ये राखीने रितेश नावाच्या व्यक्तीशी लग्न केले आहे. राखीने लग्न केल्यानंतर तिच्या पतीचा एक ही फोटो सोशल मीडियावर शेअर केला नव्हता म्हणून तिच्यावर टीका करण्यात आली होती. अनेकांनी राखीला खोटारडी आणि हा तिचा पब्लिसिट स्टंट असल्याचे म्हटले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 19, 2021 7:56 pm