छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘बिग बॉस १४’मध्ये राखी सावंत सहभागी झाली होती. तिने चॅलेंजर म्हणून एण्ट्री केली होती. पण राखी प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत होती. राखीने बिग बॉसच्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये स्थान पटकावले होते. त्यानंतर तिने १४ लाख रुपये घेऊन फिनालेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान तिने तिची आई हॉस्पिटलमध्ये कॅन्सवर उपचार घेत असल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी राखीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे माझ्या आईसाठी प्रार्थना करा असे म्हटले होते. आता राखीने व्हिडीओ शेअर करत बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे आभारा मानले आहेत.

राखीने नुकताच तिच्या इन्स्टाकग्राम अकाऊंटवर आईसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये राखीची आई सलमानचे आभार मानताना दिसत आहे. तसेच त्यांना ज्यांनी कोणी मदत केली आहे त्यांचे देखील त्यांनी आभार मानले आहेत. राखीच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत तिची आई लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे.

आणखी वाचा- ‘माझ्या आईसाठी कृपया प्रार्थना करा’, हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत राखी म्हणाली

राखीची आई संध्या मुंबईमधील हॉस्पिटलमध्ये असून कॅन्सरवर उपचार घेत आहेत. राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आईचे दोन फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करत तिने, ‘माझ्या आईसाठी प्रार्थना करा. ती कॅन्सरवर उपचार घेत आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले होते. हा फोटो पाहून चाहते भावूक झाले होते. एका चाहत्याने राखीच्या खासगी आयुष्यात इतक्या अडचणी असूनही ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती असे म्हणत कमेंट केली आहे.

बिग बॉसच्या घरात राखी सावंतने व्यक्तिगत आयुष्यात अनेक संकटाचा सामना करत असल्याचे सांगितले होते. पण घरातील इतर स्पर्धकांनी तिची ही गेम खेळण्याची पद्धत असल्याचे म्हटले होते. पण तसे नव्हते. खऱ्या आयुष्यात राखीची आई कॅन्सरशी लढा देत असल्याचे समोर आले आहे.