02 March 2021

News Flash

…म्हणून राखी सावंतने मानली हार; १४ लाख घेत सोडलं बिग बॉसचं घर

जाणून घ्या, राखी सावंतचं घराबाहेर पडण्याचं कारण

‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचं यंदाचं पर्व चांगलंच चर्चेत राहिलं. अभिनेत्री रुबिना दिलैक यंदाच्या पर्वाची विजेती ठरली. मात्र, तिच्यासोबत या पर्वातील अन्य काही स्पर्धकदेखील चर्चेत येत आहेत. यातलंच एक नाव म्हणजे राखी सावंत. ‘बिग बॉस’चा शो अर्ध्यावर सोडत राखीने बाहेरचा रस्ता धरला. विशेष म्हणजे बिग बॉसमधून बाहेर जाण्यापूर्वी तिने १४ लाख रुपये घेतल्याचं पाहायला मिळालं. तेव्हापासून सोशल मीडियावर राखीची चर्चा सुरु आहे.

रुबीनाचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास, चाहत्यांच्या मनावर केलं राज्य

‘बिग बॉस १४’ या पर्वाची रुबिना विजेती ठरली असून तिला ‘बिग बॉस’ची ट्रॉफी आणि ४४ लाख रुपये बक्षीस म्हणून मिळालं आहे. खरंतर शोच्या नियमानुसार, रुबिनाला ५० लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणं अपेक्षित होते. मात्र, या बक्षिसाच्या रकमेतील १४ लाख रुपये राखी सावंतने घेत हा शो सोडला. त्यामुळे राखीने नेमकी ही रक्कम कशासाठी आणि का घेतली ही चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे.

राखीची आई आजारी असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावरील उपचारासाठी राखीला पैशांची गरज आहे. त्यामुळे तिने ही १४ लाख रुपयांची रक्कम घेत हा शो सोडला. तसंच राखीला पाठिंबा देण्यासाठी बिंदू ‘बिग बॉस’च्या घरात आली होती. त्यावेळी बिंदूनेदेखील राखीला या शोमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर राखीने निर्णय घेत हा शो सोडला. विशेष म्हणजे शो मधून बाहेर पडण्यासाठी आणि १४ लाखांची रक्कम जिंकण्यासाठी एक टास्क देण्यात आला होता. त्यावेळी राखीने योग्यवेळी बजर दाबल्यामुळे तिला ही रक्कम मिळाली. परिणामी, राखीला प्रतिस्पर्धी असलेल्या निक्की तांबोळीला मात्र रिकाम्या हातानेच परत जावं लागलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2021 3:53 pm

Web Title: bigg boss 14 reason rakhi sawant took rs 14 lakh and quit show ssj 93
Next Stories
1 स्वातीच्या घरी लग्नाची धामधूम! संग्रामसोबत बांधणार लग्नगाठ
2 ‘भुलभुलैया-2’च्या प्रदर्शनाची घोषणा,अक्षय कुमार नाही तर कार्तिक करणार धमाल
3 ‘मला थोडा वेळ द्या’; पैसे थकवल्याच्या आरोपावर मंदार देवस्थळींचा खुलासा
Just Now!
X