01 March 2021

News Flash

‘मला इथे रहायचं नाही’; भाईजानमुळे रुबिना दिलैक सोडणार बिग बॉस?

सलमानच्या 'त्या' वक्तव्यावर संतापली रुबिना

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच गाजलेला शो म्हणजे बिग बॉस. यंदा या शोचं १४ वं पर्व असून अगदी पहिल्या दिवसापासून हा कार्यक्रम चर्चेत आहे. सध्या घरामध्ये ज्युनिअर आणि सिनिअर असा वाद रंगताना पाहायला मिळत आहे. त्यातच अभिनेत्री रुबीना दिलैक सलमान खानवर नाराज असून तिने बिग बॉसकडे सलमानची तक्रार केली आहे. सोबतच आता या शोमध्ये काम करण्याची इच्छा नाही असंही तिने सांगितलं आहे.
काही दिवसांपूर्वीच बिग बॉसच्या वीकेंड वॉरमध्ये अभिनेता सलमान खान याने अभिनव शुक्ला याची खिल्ली उडवली. सलमानचं हे वर्तन पाहून रुबीना खिन्न झाली असून तिने शोमध्ये काम करण्याचं मन नसल्याचं म्हटलं आहे.

वीकेंड वॉरमध्ये सलमान खानने अभिनव शुक्लाची खिल्ली उडवत सामान असं म्हटलं. हे सामान कुठून घेऊन आलीस असा प्रश्न सलमानने रुबीनाला विचारला. त्यावर अभिनवला सामान म्हटलेलं रुबीनाला आवडलं नाही. त्यामुळे कन्फेशन रुममध्ये जाऊन रुबीनाने सलमानची बिग बॉसकडे तक्रार केली आहे.

“काल बोलता बोलता एक गोष्ट मनाला प्रचंड लागली. त्यामुळे प्रयत्न करुनदेखील ते विचार मनातून जात नाहीत. मला अत्यंत अपमानास्पद वाटत आहे. आता माझं मन आणि विश्वास या दोन्ही गोष्टींवरचा विश्वास उडाला आहे. प्रत्येक गोष्ट योग्य होती. मात्र, तू शो नाही पाहिलास हे तुझं अपयश आहे. मी प्रत्येक गोष्ट मान्य केली कारण ते सत्य आहे”, असं रुबीना म्हणाली.

पुढे ती म्हणते, “पण जेव्हा सलमान सर मला म्हणाले की तू हे सामानसोबत घेऊन आलीस तेव्हा मला खरंच वाईट वाटलं. माझ्या नवऱ्याला असं सामान म्हणून संबोधनं योग्य नव्हतं. मी एकमेकांना समान आदर देण्यावर विश्वास ठेवते. जर मला योग्य मान मिळत नसेल तर मी इथे काम करु शकत नाही. मला अशा वातावरणात काम करायचं नाहीये. मी इथे काम करायचं नाही”.

दरम्यान, वीकेंड वॉरमध्ये सलमान खान कायमच स्पर्धकांची कानउघडणी करताना दिसक असतो. मात्र, त्याच्या वक्तव्यामुळे रुबीना नाराज झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 2:33 pm

Web Title: bigg boss 14 rubina dilaik salman khan abhinav shukla saaman comment ssj 93
Next Stories
1 नेहा कक्करचा रोका झाला, समोर आला व्हिडीओ
2 मुक्या प्राण्यांची ‘ती’ झाली अन्नपूर्णा; तेजस्विनीचा नवरात्री स्पेशल लूक
3 KBC 12: २५ लाख रुपयांच्या ‘या’ प्रश्नाला स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्हाला उत्तर माहिती आहे का?
Just Now!
X