24 November 2020

News Flash

Bigg Boss 14 : “तुझ्या खेळात मला सामील करू नकोस”; सलमानचा रुबिनाला इशारा

सूत्रसंचालक सलमान खानने रुबिना दिलैकची कानउघडणी केली.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त व तितकाच लोकप्रिय शो ‘बिग बॉस’चा चौदावा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये सूत्रसंचालक सलमान खानने रुबिना दिलैकची कानउघडणी केली. “तुझ्या खेळात मला सामील करू नकोस”, असा इशाराच सलमानने तिला दिला. रुबिनाचा पती अभिनव शुक्लासुद्धा बिग बॉसमध्ये सहभागी झाला होता. अभिनवचा उल्लेख सलमानने मागील एपिसोडमध्ये ‘सामान’ असा केल्याने रुबिनाचा पारा चढला आणि बिग बॉसकडे तिने सलमानची तक्रार केली.

शनिवारच्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये सलमान रुबिनाला म्हणाला, “आता सामानवाली गोष्ट मी बोलू की नको बोलू हे तुम्हीच मला सांगा, कारण जर मी त्या विषयाकडे वळलो, तर त्यात एकदम खोलवर जाऊन मी बोलेन. तुम्ही बिग बॉसच्या घरात चांगले खेळत आहात, पण या त्या खेळात मला सामील करू नका. मी तुमच्या स्पर्धेत सहभागी नाही. मी तुमचा सूत्रसंचालक आहे आणि तुम्ही माझ्या घरात राहत आहात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही गैरसमजुतीत राहू नका, कारण नंतर हाच गैरसमजुतीचा फुगा तुमच्या डोक्यावर फुटेल.”

आणखी वाचा : मी केवळ व्हिसा मिळवण्यासाठी लग्न केलं; राधिका आपटेचा खुलासा 

या एपिसोडनंतर ट्विटरवर त्याची चर्चा सुरू झाली. काहींनी रुबिनाची बाजू घेतली तर काहींनी तिला ट्रोल केलं. अभिनवचा उल्लेख सलमानने ‘सामान’ असा केल्याने रुबिनाने बिग बॉससमोर तिची नाराजी बोलून दाखवली होती. “जिथे माझा आदर केला जाऊ शकत नाही, तिथे मी काम करू शकत नाही”, अशा शब्दांत तिने संताप व्यक्त केला होता. त्याचप्रमाणे शो सोडून जाण्याचंही तिने ठरवलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 12:23 pm

Web Title: bigg boss 14 salman khan confronts rubina dilaik about her complaints against him ssv 92
Next Stories
1 मी केवळ व्हिसा मिळवण्यासाठी लग्न केलं; राधिका आपटेचा खुलासा
2 लस्ट स्टोरीजमधील ‘व्हायब्रेटर सीन’वर कियाराने दिली प्रतिक्रिया, म्हणाली..
3 Videos : ‘मिले हो तुम हमको..’; स्वत:च्या लग्नात नेहा कक्करने गायलं गाणं, केला अफलातून डान्स
Just Now!
X