28 September 2020

News Flash

बिग बॉस १४चा प्रोमो प्रदर्शित, शोला मिळावे नवे टायटल

यंदाच्या सीझनमध्ये अनेक बदल होणार असल्याचे म्हटले जाते.

गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस १४ चर्चेत आहे. या चर्चा बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यंदाचे सीझन होस्ट करणार नसल्याचे म्हटले जात असल्यामुळे सुरु झाल्या होत्या. पण या सर्व अफवा असल्याचे आता समोर आले आहे. नुकताच बिग बॉस १४चा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. हा प्रोमो पाहता यंदाच्या सीझनमध्ये बदल करण्यात आले असल्याचे दिसत आहे.

कलर्सने बिग बॉस १४चा प्रोमो त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान शेती करताना दिसत आहे. त्यामुळे बिग बॉस १४मध्ये नवे ट्विस्ट येणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच यंदा बिग बॉसच्या १४व्या पर्वला ‘बिग बॉस 2020’ हे टायटल देण्यात आले आहे.

सध्या बिग बॉसचा हा प्रोमो चर्चेत आहे. या प्रोमो व्हिडीओमध्ये सलमान, ‘लॉकडाउनमुळे नॉर्मल लाइफमध्ये स्पीड ब्रेकर आला आहे. त्यामुळे मी शेती करत आहे. पण आता सीन पलटणार’ असे बोलताना दिसत आहे. शोच्या टायटल संदर्भात अनेक चर्चा होत आहेत. बिग बॉसचे नवे सीझन बिग बॉस १४च्या ऐवजी बिग बॉस २०२० म्हणून ओळखले जाणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये शोबाबत उत्सुकता वाढली आहे.

यंदाची थीम काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शोमध्ये निया शर्मा, विवियन डिसेना, सुगंधा मिश्रा, अविनाश मुखर्जी, शिरीन मिर्जा हे कलाकार दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच बिग बॉस १४मध्ये स्पर्धकांनी एण्ट्री करण्यापूर्वी करोना चाचणी करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 11:11 am

Web Title: bigg boss 14 salman khan show got new title avb 95
Next Stories
1 ‘सुशांतच्या रुममधील फॅनही वाकलेला नव्हता, कडीही तुटलेली होती’; फॉरेन्सिक तज्ज्ञाचा खुलासा
2 ‘करण जोहरची नवी खास मैत्री असल्यामुळे तिला..’,सुचित्रा कृष्णमूर्तिचा नेहा धूपियावर निशाणा
3 ‘ओटीटी आणि चित्रपटगृहे दोन्हींचे अस्तित्व महत्वाचे’
Just Now!
X