01 October 2020

News Flash

Bigg Boss 14 : सलमान खान की सिद्धार्थ शुक्ला? नेमकं कोण करणार यंदाच्या पर्वाचं सूत्रसंचालन?

सिद्धार्थ शुक्ला करणार बिग बॉस १४ चं सूत्रसंचालन?

या शोमध्ये कोणते कलाकार सहभागी होणार हे अद्याप समोर आलेले नाही.

गेल्या काही दिवसांपासून’बिग बॉस’च्या नव्या पर्वाची म्हणजेच ‘बिग बॉस १४’ची जोरदार चर्चा सुरु आहे. यंदा या पर्वात अनेक बदल करण्यात आले असून हा शो ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे या शोमध्ये करण्यात आलेल्या अनेक बदलांपैकी एक बदल सूत्रसंचालकांमध्येदेखील करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या नव्या पर्वात अभिनेता सिद्धार्थ शुक्ला होस्टच्या भूमिकेत पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.

‘बिग बॉस’ हा शो त्यात देण्यात येणारे विविध टास्क आणि खासकरुन अभिनेता सलमान खानच्या सूत्रसंचालनासाठी ओळखला जातो. मात्र यंदा रंगणाऱ्या पर्वात सलमान खानला सिद्धार्थ शुक्लाची साथ मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, अद्यापतरी याविषयी कोणतीही अधिकृत माहिती स्पष्ट करण्यात आलेली नाही.

 

View this post on Instagram

 

Thinking of a caption…. do ya have any in mind …

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla) on

दरम्यान, सिद्धार्थ शुक्ला बिग बॉस १३ चा विजेता असून आज तो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखला जातो. त्यामुळे यंदाच्या पर्वातदेखील तो दिसण्याची शक्यता असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 10:15 am

Web Title: bigg boss 14 sidharth shukla to co host with salman khan ssj 93
Next Stories
1 ‘जेव्हा दाजी येतात घरी’; सई, प्रार्थनाने घेतली सोनालीच्या होणाऱ्या पतीची भेट
2 त्यावेळी चित्रपटसृष्टीत मराठी लोकांना घाटी संबोधलं जायचं : उर्मिला मातोंडकर
3 दिया मिर्झाचा जया बच्चन यांना पाठिंबा; म्हणाली…
Just Now!
X