News Flash

हा काय डान्स आहे का? ‘नागीन’ डान्सवर थिरकली राखी-राहुलची जोडी

राखी-राहुलचा 'नागीन' डान्स पाहिलात?

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’चं यंदाचं पर्व चांगलंच गाजताना दिसत आहे. या पर्वात सहभाग घेतलेला प्रत्येक स्पर्धक त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य आणि चित्रविचित्र कारनाम्यांमुळे चर्चेत येत आहे. यामध्येच सध्या सोशल मीडियावर राखी सावंत आणि राहुल महाजन यांच्या डान्सचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या दोघांनीही ‘नागीन’ गाण्यावर डान्स केला आहे.

‘कलर्स टीव्ही’ने त्यांच्या इन्स्टाग्रामवर ‘बिग बॉस १४’ चा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमो व्हिडीओमध्ये राहुल आणि राखीने रुबिनाच्या सांगण्यावर ‘नागीन’ डान्स केला आहे. आगामी भागात बिग बॉसच्या घरात ‘द रुबिना शो’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. यात रुबिना प्रत्येकाला त्यांच्या स्वभावानुसार एक गाणं सांगत असून त्यावर ते स्पर्धक थिरकताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

दरम्यान, राखी आणि राहुलचा डान्स पाहुन अनेकांना हसू अनावर झालं आहे. अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तर काहींनी त्यांना पाठिंबा देत उत्तम मनोरंजन करत आहात असंही म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 2:26 pm

Web Title: bigg boss 14 the rubina show rakhi sawant and rahul mahajan dance video ssj 93
Next Stories
1 ‘एजाजच्या प्रेयसीने मला घरी बोलावलं अन्…’; विकास गुप्ताचा धक्कादायक खुलासा
2 सोनू सूदने ‘त्या’ चाहत्याला दिलं सरप्राइज; स्वत:च झाला आचारी
3 सलमान -रेमोमधील वादावर पडदा? रेमोच्या पत्नीने मानले भाईजानचे आभार
Just Now!
X