News Flash

‘एजाजच्या प्रेयसीने मला घरी बोलावलं अन्…’; विकास गुप्ताचा धक्कादायक खुलासा

गर्लफ्रेंडमुळे एजाज-विकासमध्ये वादाची ठिणगी

छोट्या पडद्यावरील बिग बॉस १४ हे यंदाचं पर्व चांगलंच गाजत आहे. या पर्वात टास्कपेक्षा स्पर्धकांमधील वाद आणि वादग्रस्त वक्तव्य सर्वाधिक चर्चेत राहिले आहेत. सध्या या घरात प्रत्येकाचे एकमेकांशी वाद होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या वादात अनेक जणांनी एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यावरदेखील टीका केली आहे. अलिकडेच विकास गुप्ताने एजाज खानच्या प्रेयसीविषयी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे या दोघांमधील वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळालं.

मध्यंतरी विकास गुप्ता आणि अर्शी खान यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. त्यांच्यातील हे भांडण संपत नाही तर तोच विकास गुप्ता आणि एजाजचं भांडण झालं. विशेष म्हणजे या भांडणाचं मूळ कारण एजाज खानची प्रेयसी होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)


घरात सतत होणाऱ्या भांडणाविषयी विकास निक्कीसोबत चर्चा करत होते. त्यावेळी त्याने एजाजच्या प्रेयसीविषयी व्यक्त झाला. “काही काळापूर्वी माझी एका मुलीसोबत मैत्री झाली होती. त्या मुलीने मला तिच्या घरी बोलावलं होतं. त्यावेळी मी साधारणपणे २१ वर्षांचा असेल. ज्यावेळी मी त्या मुलीच्या घरी गेलो तेव्हा एजाज माझ्या समोर बसला होता आणि जमिनीवर एक फोन तुटलेल्या अवस्थेत पडला होता. समोरचं दृश्य पाहून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, एजाज तिचा प्रियकर आहे आणि ही मुलगी त्याची फसवणूक करत आहे”, असं विकासने सांगितलं.

पुढे तो म्हणतो, “त्या मुलीच्या घरी एजाजला पाहिल्यानंतर मी परत कधीच तिच्याशी संपर्क केला नाही. पण एजाजला वाटतंय माझ्यामुळे त्याच्यात आणि त्याच्या गर्लफ्रेंडमध्ये गैरसमज निर्माण झाले. पण आता सत्य काय आहे हे सगळ्यांनीच पाहिलं आहे त्यामुळे त्यानेदेखील त्याची चूक मान्य करावी. तसंच मला आता या विषयावर एजाजसोबत कोणत्याच प्रकारची चर्चा करायची नाहीये”.

दरम्यान, ‘बिग बॉस १४’ हे पर्व यंदा चांगलंच गाजताना दिसतंय. या पर्वात सुरुवातीच्या काळात जान कुमार सानू, राहुल वैद्य, निक्की तांबोळी हे स्पर्धक चर्चेत होते. तर आता विकास गुप्ता, राखी सावंत,एजाज खान या स्पर्धकांची चर्चा रंगू लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 1:33 pm

Web Title: bigg boss 14 vikas gupta claims eijaz khans ex girlfriend called him at her place was cheating on him ssj 93
Next Stories
1 सोनू सूदने ‘त्या’ चाहत्याला दिलं सरप्राइज; स्वत:च झाला आचारी
2 सलमान -रेमोमधील वादावर पडदा? रेमोच्या पत्नीने मानले भाईजानचे आभार
3 ख्रिसमससाठी प्रियांकाची खास शॉपिंग; जॅकेटची किंमत ऐकून व्हाल थक्क!
Just Now!
X