छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस १४.’ घरातील प्रत्येक स्पर्धक प्रेक्षकांचे मनोरंजन करत असल्याचे दिसत आहे. पण राखी सावंत सर्वांचे लक्ष वेधून घेत असल्याचे पाहायला मिळते. नुकताच पार पडलेल्या भागामध्ये राखी सावंतवर रॅपर यशराज मुखातेने एक व्हिडीओ तयार केला आहे.
बिग बॉसच्या एका भागामध्ये राखी सावंतची पाण्याची बॉटल स्विमिंग पूलमध्ये फेकली होती. त्यावर राखी माझी बॉटल पाण्यात कोणी फेकली असे विचारताना दिसते. या सर्वावर यशराजने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. यापूर्वी यशराजचा ‘रसोड़े में कौन था’ व्हिडीओ चर्चेत होते.
View this post on Instagram
बिग बॉसच्या कालच्या भागामध्ये यशराजचा हा व्हिडीओ दाखवण्यात आला आहे. हा व्हिडीओ कलर्स टीव्हीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राखी बोलताना दिसत आहे, ‘माझी पाण्याची बाटली स्विमिंग पूलमध्ये कोणी फेकली, बिग बॉस, कृपया सगळ्या टेप रिवाइंट करा आणि चेक करा.’
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये राखी अर्शी खानवर निशाणा साधताना दिसत आहे. ‘ही वेडी कोण आहे, कोणी माझी बाटली फेकली आहे, तू तर नाही ना ती? माझी बाटली स्विमिंगपूलमध्ये कोणी फेकली? ही प्रत्येक फ्रेममध्ये माझी फ्रेम कट करते आहे’ असे राखी सावंत पुढे बोलताना दिसते. यशराजच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 12, 2021 7:07 pm