28 February 2021

News Flash

Video : एजाज-पवित्राच्या प्रेमाला बहर; ‘बिग बॉस’च्या घरात रंगली रोमॅण्टिक डेट

पाहा, नेमकं काय सुरु आहे बिग बॉसच्या घरात

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस १४’ हा शो गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. कधी वादग्रस्त विधानांमुळे तर कधी टास्कमुळे. पण हा शो कायम चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतो. मात्र, यावेळी हा शो एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. जेथे कायम वाद रंगतो तेथे प्रेमाचा बहर आल्याचं एकंदरीत दिसून येत आहे. कारण पवित्रा पुनिया आणि एजाज खान हे दोघं रोमॅण्टिक डेटवर गेल्याचं दिसून येत आहे.

अलिकडेच रंगलेल्या एका टास्कमध्ये शहनाज गिलने पवित्रा आणि एजाज यांना रोमॅण्टिक डेटवर जाण्यास सांगितलं. त्यामुळे हे दोघंही डेटवर गेल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे या डेटमध्ये त्यांनी एकमेकांमध्ये निर्माण झालेले गैरसमज दूरदेखील केले.

आणखी वाचा- ‘बिग बॉसच्या घरात फिक्सिंग होतंय’; कविता कौशिकचा आरोप

दरम्यान, सध्याच्या पर्वामध्ये पवित्रा आणि एजाज हे लोकप्रिय स्पर्धक ठरत आहेत. पवित्रा अनेकदा तिच्या टास्क खेळण्यामुळे चर्चेत असते. तर एजाज त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतो. मात्र, या दोघांमधील हा रोमॅण्टिक अंदाज पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र या भागाची चर्चा होताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2020 2:41 pm

Web Title: bigg boss 2020 salman khan show ajaz khan and pavitra punia dcp 98 ssj 93
Next Stories
1 ‘बिग बॉसच्या घरात फिक्सिंग होतंय’; कविता कौशिकचा आरोप
2 ‘या राजकीय व्यक्तीचा स्वॅग पाहा’; स्वराने शेअर केलेला व्हिडीओ होतोय व्हायरल
3 Video : ‘लक्ष्मीकांत बेर्डेंची जागा घेणं कोणाला शक्य नाही’
Just Now!
X