News Flash

‘बिग बॉस ७’च्या स्पर्धकांची नावे जाहीर

बिग बॉसमध्ये माध्यमांच्या झोकात राहणा-या सेलिब्रिटींचा समावेश करण्यात येतो.

| September 15, 2013 01:07 am

नुकतीच ‘बिग बॉस ७’च्या संभाव्य स्पर्धकांची यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता या रियालिटी शोच्या स्पर्धंकांची अखेरची यादी आली असून यात कमालीचा बदल दिसत आहे. बिग बॉसमध्ये माध्यमांच्या झोकात राहणा-या सेलिब्रिटींचा समावेश करण्यात येतो. कलाकार, टीव्ही कलाकार, मॉडेल, समाज कार्यकर्ता अशांचा समावेश असतो. हे सर्व स्पर्धक तीन महिन्यांसाठी बिग बॉसने त्यांच्यासाठी लोणावळा येथे  तयार केलेल्या घरात राहणार आहेत. सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला हा रियालिटी शो आजपासून (१५ सप्टेंबर) प्रदर्शत होत आहे.  पूनम पांडेचे नावही या शोमध्ये घेतले जात होते. पण, तिने केलेल्या तीन कोटींच्या मागणीमुळे निर्मात्यांनी बाजूला सारल्याचे या यादीवरून दिसते. ‘बिग बॉस ७’मधील स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणेः
१. अनिता अडवाणी- दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्याशी घनिष्ट संबंध असल्याचा दावा करून त्यांच्या मालमत्तेत हिस्सा मागून अनिता अडवाणी चर्चेत राहिली आहे.
२.अपूर्व आणि शिल्पा अग्निहोत्री- हे दोघेही टीव्ही कलाकार आहेत.
३. कौशल टंडन- एक हजारो मै मेरी बहना है या मालिकेतू प्रसिद्धीस आलेला कलाकार. यापूर्वी कौशल बिग बॉसमध्ये येणार असल्याची चर्चा होती.
४. हेजल कीच- सलमानच्या बॉडीगार्ड चित्रपटात हेजल दिसली होती.
५. गोहार खान- खान बहिणींपैकी एक असलेली अभिनेत्री गोहार खान इश्कजादे चित्रपटात झळकली होती.
६. रजत रावैल- हा एक दिग्दर्शक आणि निर्माता आहे.
७. प्रत्युषा बॅनर्जी- बालिका वधू मालिकेत प्रत्युषाने आनंदीची भूमिका केली होती.
८. व्हीजे अॅन्डी- अॅन्डी ब्युटी अॅन्ड द गीक या शोचा सूत्रसंचालक आहे.
९. अरमान कोहली- अरमान अखेर एसओसी- कारगिल या चित्रपटात दिसला होता.
१०. तनिषा- काजोलची बहिण आणि बॉलीवूड अभिनेत्री
११. एली एव्हरम- आंतरराष्ट्रीय डान्सर आणि सलमानची मैत्रीण एली मिकी वायरस चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.
१२. रतन राजपूत- टीव्ही कलाकार रतन राजपूत अगले जनम मोहे बिटीया ही कीजो ही मालिका केली होती.
१३. संग्राम सिंग- भारताचा कुस्तीपटू

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 1:07 am

Web Title: bigg boss 7 final list of celebs
Next Stories
1 सिनेमात स्थिरावण्यासाठी ग्लॅमर तडका हवा…
2 मराठी दिग्दर्शक हिंदीकडे…यशस्वीही व्हा
3 माधुरी दीक्षितला पितृशोक