News Flash

‘बिग बॉस’मध्ये राजनीती

'बिग बॉस ७'च्या या पर्वात शांतता नांदेल असे वाटत नाही.

| November 6, 2013 04:07 am

‘बिग बॉस ७’च्या या पर्वात शांतता नांदेल असे वाटत नाही. रोज कोणाचे ना कोणाचे भांडण यात पाहायला मिळते. त्यातून आता बिग बॉसने राजनीती हा नवा टास्क दिला असून, घरातील सर्व सदस्यांना दोन भागात विभागण्यात आले आहे. राजनीतीचा विषय आणि वाद होणार नाही हे तर शक्यच नाही.
यावेळी, बिग बॉसमध्ये कॅट फाइट पाहण्यास मिळणार आहे. गोहर आणि तनिषा या दोघींमध्ये पुन्हा भांडण झाले आहे. काही आठवड्यांपूर्वी या दोघींमध्ये वाद झाला होता. तेव्हापासून त्यांच्यातील संबंध काही फारसे चांगले नव्हते. नंतर सलमानने या दोघींची मैत्रीदेखील करून दिली होती. पण, शेवटी हे बिग बॉसचे घर किती दिवस मैत्री टिकणार. राजनीती टास्कमध्ये या दोघी डिबेटसाठी आमने-सामने आल्या आणि हेच त्यांच्यातील वादाचे कारण ठरले. दोन्ही पक्षांना वाद-विवादासाठी त्यांचा प्रतिस्पर्धी पाठवण्यास बिग बॉसने सांगितले होते. त्यानुसार, कामयाच्या पक्षातून गोहरने तर एलीच्या पक्षातून अॅण्डीने पुढाकार घेतला. यावेळी दुस-या पक्षातील सामर्थ्य आणि त्यांच्यातील कमकुवत गोष्टींबद्दल बोलायचे होते. त्यावर गोहरने संग्राम लिडरशीप निभावण्यात आणि योग्य बाजू मांडण्यास कशाप्रकारे अयशस्वी ठरला याबाबत तिचे मत मांडले. यावरून चिडलेल्या तनिषाने मध्ये पडून गोहरला ‘कूक’ (स्वयंपाक करणारी) बोलून हिणवले आणि दोघींच्या भांडणास सुरुवात झाली. आपल्याला कूक म्हणून हिणवल्यामुळे गोहरने यापुढे स्वयंपाक न करण्याचा निर्णय घेतला आणि कामयाला ते काम करण्यास सांगितले.
तनिषा आणि गोहरच्या या वादामुळे बहुतेक बिग बॉसच्या सर्वच सदस्यांवर उपाशी राहण्याची वेळ न येऊ दे म्हणजे झालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 4:07 am

Web Title: bigg boss 7 gauahar tanishaas cat fight
Next Stories
1 होणार सून मी ‘श्री’च्या घरची!
2 सैफच्या ‘इंटिमेट’ दृश्यांमुळे मला चिंता वाटत नाही – करिना
3 बॉलीवूड बंगाली सौंदर्यवतींचा पश्चिम बंगाल सरकारकडून सत्कार
Just Now!
X