या वर्षीचा बहुचर्चित रियालिटी शो ‘बिग बॉस ७’ चा उद्या शेवटचा एपिसोड असणार आहे. ग्रॅण्ड फिनालेमध्ये सलमान शोच्या स्पर्धकांसोबत थिरकताना दिसणार आहे. विशेष म्हणजे तो बिग बॉसमधील त्याची सर्वात आवडती स्पर्धक एली अवरामसोबत ठुमके लावणार आहे. हे दोघजण एक था टायगरमधील माशाल्ला माशाल्ला या गाण्यावर नृत्य करतील.
मिकी वायरस या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी एली ही ये मेरा दीवाना पन है, हवा हवाई आणि धक धक करने लगा या गाण्यावर एकेरी नृत्य करणार आहे.

तसेच, सलमान हा अरमानसोबत बॉडीगार्डमधील देसी बिट तर प्रत्युषा बॅनर्जी आणि कामया पंजाबीसोबत फेविकॉल से या गाण्यांवर नृत्य करणार आहे. तनिषा-अरमान आणि गौहर-कुशाल या जोड्या रोमाण्टिक गाण्यावर नृत्य करणार आहेत. तर, इतर सदस्य एजाझ, संग्राम आणि एन्डी हे कॉमेडी गाण्यावर नृत्य करताना दिसतील.