28 September 2020

News Flash

‘बिग बॉस ८’मध्ये वाहू लागले प्रेमाचे वारे!

'बिग बॉस'ची स्पर्धक सोनाली गेले काही दिवस खूप चर्चेत आहे. तीचे डिआंड्रासोबत भांडण असो किंवा गौतम, उपेन यांच्याशी जवळीक या ना त्या कारणाने ती चर्चेत

| October 21, 2014 12:57 pm

‘बिग बॉस’ची स्पर्धक सोनाली गेले काही दिवस खूप चर्चेत आहे. तीचे डिआंड्रासोबत भांडण असो किंवा गौतम, उपेन यांच्याशी जवळीक या ना त्या कारणाने ती चर्चेत येतेयं. आता सोनाली आणि गौतम यांच्यातील जवळीक आणि त्यांचे संभाषण यावरून बिग बॉसमध्ये प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत असे म्हणायाल हरकत नाही.  
सुशांत सोनालीला म्हणाला की, तू जर गौतमला पसंत करतेस तर तुमच्या नात्यात तू पुढे का जात नाहीस. यावर आपल्याला गौतम लाजाळू वाटतो आणि तो त्यांच्यातील नात्यावर मनमोकळेपणाने बोलू शकत नाही असे सोनाली म्हणाली. तसेच, गौतमजवळ आपल्या भावना कशा व्यक्त कराव्यात हेदेखील आपल्याला समजत नसल्याचे सोनाली म्हणाली.
पुढे सोनाली लिव्हिंग रुम परिसरात गौतमसमोर प्रणितशी बोलताना दिसली. गौतमबद्दल मनात असलेल्या भावना सांगण्यास आपण असमर्थ असल्याचे सोनालीने प्रणितला सांगितले. त्याचवेळी गौतमने हे सर्व संभाषण गुपचूप ऐकले. यावर प्रणितने गौतमला सोनालीसमोर आपल्या भावना व्यक्त करण्याचा सल्ला दिला. रात्री संपूर्ण घरातील दिवे बंद करण्यात आल्यानंतर गौतम आणि सोनाली एकाच बेडवर झोपून चर्चा करताना दिसले. बहुतेक ‘बिग बॉस’च्या या पर्वातही गौहर-कुशालप्रमाणे नवी जोडी तयार होणार आहे असे चित्र दिसते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2014 12:57 pm

Web Title: bigg boss 8 love is in the air for sonali raut and gautam gulati
टॅग Salman Khan
Next Stories
1 पाहा आलिया भट्टचा लघुपटः अज्ञात पुरुषांसोबत महिला सुरक्षित आहेत का?
2 दिवाळी विशेषः सारसबागेतील लाख दिव्यांचे आकर्षण…
3 बिग बॉस ८ : दिवाळीच्या तोंडावर मिठाई बनविण्याचे कार्य
Just Now!
X