News Flash

‘बिग बॉस’चे स्पर्धक अपघातग्रस्त विमानात राहणार

‘बिग बॉस’च्या सातव्या पर्वात वैमानिकाच्या वेशात आलेला सलमान खान आणि त्यानंतर विमानातील त्याचे प्रोमोज यामुळे या वेळी सेट नक्की काय असणार आहे याबद्दल अनेक तर्कवितर्क

| September 23, 2014 06:26 am

‘बिग बॉस’चे स्पर्धक अपघातग्रस्त विमानात राहणार

‘बिग बॉस’च्या सातव्या पर्वात वैमानिकाच्या वेशात आलेला सलमान खान आणि त्यानंतर विमानातील त्याचे प्रोमोज यामुळे या वेळी सेट नक्की काय असणार आहे याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते. पण नुकत्याच समोर आलेल्या फोटोनुसार यंदाच्या पर्वामध्ये स्पर्धक एका अपघातग्रस्त विमानामध्ये फसणार आहेत.
दरवेळीप्रमाणे यंदाही ‘बिग बॉस’चा सेट लोणावळ्याला बांधला असला तरी, यंदाच्या पर्वामध्ये आलिशान घराला रजा देण्यात आली असून स्पर्धक थेट एका विमानात अडकलेले दिसणार आहेत. विमानाच्या ‘बिझनेस’ आणि ‘इकॉनॉमी’ क्लासनुसार स्पर्धकांच्या बसण्याची व्यवस्था केलेली पाहायला मिळेल. विमानात झोपायला पलंग नसतो, तसेच या विमानातसुद्धा स्पर्धकांना पलंगाऐवजी खुच्र्यावर झोपायला लागणार आहे. त्यातच स्पर्धकांना स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकघाराची सुविधाही नाही. त्यामुळे झोपेचा आणि जेवणाचा प्रश्न स्पर्धक आता कसे सोडवतात हे पाहायचे!
त्याबरोबर नेहमीच्या घरासमोरील तरणतलाव आणि बागेऐवजी पडकी, अंधारी जागा आली आहे. त्यामुळे आता स्पर्धक या विमानातच अडकून राहतात की, त्यांना यथावकाश राहायला जागा मिळते हे कार्यक्रम पाहिल्यावरच कळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2014 6:26 am

Web Title: bigg boss 8 will the aircraft style house have no beds
टॅग : Salman Khan,Television
Next Stories
1 हृतिकच्या आव्हानाला प्रियांका चोप्राचे प्रत्युत्तर
2 CELEBRITY BLOG: झेंडा लावायचा आणि कायदे मोडायचे ही कसली मनोवृत्ती…
3 पाहाः कंगना, इमरान हाश्मीच्या ‘उंगली’चा मोशन पोस्टर
Just Now!
X