News Flash

“तू आत्महत्या का करत नाहीस?”; नेटकऱ्याच्या प्रश्नावर अभिनेत्री म्हणाली…

बिग फेम अभिनेत्रीने नेटकऱ्याला दिलं सडेतोड उत्तर

टीव्ही अभिनेत्री बेनाफ्सा सूनावाला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहाते. यावेळी बेनाफ्साने चाहत्यांसोबत एक लाईव्ह चॅट केले होते. या चॅटमध्ये एका युझरने तिला चकित करणारा प्रश्न विचारला. हा प्रश्न पाहून बेनाफ्सा प्रचंड संतापली. तिने थेट त्या नेटकऱ्याविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे.

असा कोणता प्रश्न विचारला होता?

एका युझरने बेनाफ्साला तू आत्महत्या का करत नाहीस? असा प्रश्न विचारला होता. हा प्रश्न पाहून अभिनेत्री संतापली. “जगभरातील लोक सध्या करोनामुळे त्रस्त आहेत. लोक मानसिक आजारांशी लढत आहेत. गरीब व्यक्ती बेरोजगार झाला आहे. आणि तू काय विचारतोय? असे प्रश्न विचारण्यापूर्वी जरा एकदा विचार कर.” अशा आशयाची पोस्ट लिहून बेनाफ्साने त्याला प्रत्युत्तर दिले. तसेच आपल्या पोस्टमध्ये तिने सायबर पोलिसांना देखील टॅग केले आहे. बेनाफ्साची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

बेनाफ्सा सूनावाला एक टीव्ही अभिनेत्री आहे. द रॉयल पॅलेट, बॉक्स क्रिकेट लीग, एम टीव्ही ट्रोल पोलीस यांसारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती झळकली आहे. मात्र तिला खरी प्रसिद्धी बिग बॉस या शो दिली. बेनाफ्सा सोशल मीडियावर आपल्या मादक फोटोंमुळे चर्चेत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 7:25 pm

Web Title: bigg boss contestant benafsha soonawalla asked to commit suicide mppg 94
Next Stories
1 “तुझ्या वडिलांना हे प्रश्नसुद्धा विचार “; पूजा भट्टला कंगनाचं सडेतोड उत्तर
2 सुशांतच्या आत्महत्येनंतर गायिकेने घेतला मोठा निर्णय
3 भट्ट कुटुंबीयांनी कंगनाला लाँच केले, घराणेशाही वादावर पूजा भट्टने सोडले मौन
Just Now!
X