News Flash

‘मी बिग बॉसच्या घराला आग लावेन’

सलमान स्वतः देशद्रोही आहे

बिग बॉस १०

टीव्हीचा प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १०’ मधून बाहेर काढल्यानंतरही स्वामी ओम काही शांत बसण्याचे नाव घेत नाहीत. ते प्रत्येक दिवशी असे काही वक्तव्य करतात की त्यामुळे अनेक चर्चांना उधाण येते. काही दिवसांपूर्वी स्वामी एका मुलाखतीसाठी वृत्त वाहिनीत गेले होते. तिथे त्यांनी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका महिलेसोबत वाद घातला. नंतर हा वाद एवढा वाढला की स्वामींनी त्या महिलेला अर्वाच्य भाषेत बोलायला सुरुवात केली. या सगळ्या गोंधळात त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्याने मध्यस्थी केली आणि वातावरण शांत केले. पण दुसऱ्यांचे ऐकतील ते स्वामी कसले. तरीही स्वामी सतत बोलतच होते.

लाइव्ह हिंदुस्थान या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, याआधीही एका मुलाखतीत ओम यांनी सांगितले होते की, जर बिग बॉसने मला २८ तारखेच्या आधी घरात परत घेतले नाही तर मी या शोचा महाअंतिम सामना होऊ देणार नाही. कोणालाच विजेता बनू देणार नाही. कारण मीच विजेता होतो, आहे आणि पुढेही असणार. मीच विजेता आहे हे सिद्ध करण्यासाठी मी सलमान खानलाही मारेन, बिग बॉसलाही मारेन, मी तिथे जाऊन आग लावेन. त्या सगळ्या मुला-मुलींना मी फरफटत बाहेर आणेन आणि पोलिसांकडे देईन. सलमान स्वतः देशद्रोही आहे. त्याने स्वतः सांगितले आहे की तो दाऊद इब्राहीम, हाफिज सईद, अबु सालेम आणि आयएसआयचा एजंट आहे. ते माझे मित्र आहेत, ते जसे सांगतील तसा मी वागतो. सलमानने हेही सांगितले की, शाहरुख आणि आमिर यांच्यासोबत मिळून हिंदुस्तानला इस्लामिस्तान बनवू पण मी असे काही होऊ देणार नाही.

दरम्यान, काळवीट शिकारप्रकरणी जोधपूर न्यायालयाने अभिनेता सलमान खान आणि अन्य आरोपींना २५ जानेवारीपूर्वी न्यायालयासमोर हजर राहावे असे आदेश दिले आहेत. अभिनेत्री नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि अभिनेता सैफ अली खान हादेखील या प्रकरणातील आरोपी आहे. काळवीट शिकार प्रकरणाने सलमान खान अडचणीत आला होता. राजस्थान हायकोर्टाने गेल्यावर्षी जुलैमध्ये सलमानची काळवीट शिकार प्रकरणातून निर्दोष सुटका केली होती. कोर्टाने सलमान खानच्या परदेशवारीवर निर्बंध घातले होते. मात्र राजस्थान सरकारने याविरोधात पुन्हा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 3:12 pm

Web Title: bigg boss ex contestant om swami fight at news channel
Next Stories
1 अश्विनी भावेच्या ‘मांजा’चा टिझर पोस्टर
2 जाणून घ्या, दिलीप प्रभावळकर यांच्या ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ मालिकेची कथा
3 शाहरुखचे मुलांना ज्ञान, महिलांचा सन्मान नाही केला तर…
Just Now!
X