05 August 2020

News Flash

बिग बॉस फेम शहनाज गिलच्या वडिलांवर बलात्काराचा आरोप

या प्रकारणी एका महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे..

शहनाज गिलने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका बिग बॉस पर्व १३मध्ये धुमाकूळ घातला होता. तिची आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्लाची जोडी विशेष गाजली होती. त्यावेळी तिच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. पण आता शहनाज एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. या चर्चा शहनाजचे वडिल संतोख सिंह सुख यांच्या विरोधात एका महिलेने गुन्हा दाखल केल्यामुळे सुरु झाल्या आहेत.

जालंधरमध्ये एका महिलेने शहनाजचे वडिल संतोख यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. या महिलेने संतोख यांच्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. शहनाजच्या वडिलांवर लावण्यात आलेलेल आरोप खरे आहेत की खोटे हे अद्याप सिद्ध झालेले नाही.

शहनाजचे संपूर्ण कुटुंब पंजाबमध्ये राहते. पण सध्या लॉकडाउनमुळे शहनाज आणि तिचा भाऊ मुंबईमध्ये अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी शहनाजच्या आजीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या वडिलांनी सोशल मीडियाद्वारे याबाबत माहिती दिली होती. आजी आजारी असतानाही शहनाजला पंजाबला येणे शक्य नव्हते.

बिग बॉस १३ या शोमुळे शहानाज गिलला संपूर्ण देशात लोकप्रिय मिळाली आहे. जेव्हा शहनाज बिग बॉसमध्ये सहभागी झाली होती तेव्हा तिचे वडिल फॅमिली विकमध्ये तिला भेटायला तेथे पोहोचले होते. शहनाज हा शो जिंकू शकली नसली तरी तिची आणि सिद्धार्थची जोडी त्यावेळी विशेष हीट झाली होती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2020 5:14 pm

Web Title: bigg boss fame shehnaaz gill father santokh singh sukh booked for rape charge avb 95
Next Stories
1 ‘ती’ गोड बातमी ऐकून हॅरी पॉटर म्हणतो, “माझं बालपण आज अधिकृतरित्या संपलं”
2 जाणून घ्या कोण आहे ‘चाकू’
3 ‘पाताल लोक’ च्या यशावर जगजीत संधू म्हणतो…
Just Now!
X