23 October 2020

News Flash

‘बिग बॉस मराठी’ फेम सई लोकूरच्या आयुष्यात आलं नवं प्रेम; पाहा फोटो

त्या खास व्यक्तीसोबत सईने पोस्ट केला फोटो

सई लोकूर

‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सिझनमध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेली अभिनेत्री सई लोकूर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चर्चेमागचं कारण आहे, तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेला फोटो. या फोटोच्या माध्यमातून सईने तिच्या खासगी आयुष्याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. एका खास व्यक्तीसोबतचा सईचा हा फोटो असून त्याच्या कॅप्शनमध्ये तिने प्रेमात असल्याची भावना व्यक्त केली आहे.

‘स्वर्गात गाठी बांधल्या जातात यावर विश्वास ठेवण्यासाठी माझ्याकडे अनेक कारणं आहेत आणि मला माझा साथीदार मिळाला’, असं सईने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. यासोबतच #inlove असा हॅशटॅगसुद्धा तिने या फोटोला दिला आहे. सई ज्या व्यक्तीच्या प्रेमात आहे, त्या व्यक्तीचा चेहरा मात्र या फोटोत दिसत नाही. फोटोमध्ये सई आणि तिची प्रिय व्यक्ती पाठमोरे उभे आहेत.

आणखी वाचा : निवेदिता सराफ ते क्रांती रेडकर.. फक्त कलाकारच नाही तर सोबत यशस्वी उद्योजकही

‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमध्ये सई चांगलीच चर्चेत होती. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘किस किसको प्यार करु’ या हिंदी चित्रपटात देखील सई झळकली होती. या चित्रपटात कॉमेडी किंग कपिल शर्मा देखील होता. सईने या चित्रपटात कपिलच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 10:18 am

Web Title: bigg boss marathi 1 finalist sai lokur reveals she is in love ssv 92
Next Stories
1 ‘या’ अभिनेत्यामुळे अमिताभ बच्चन झाले बॉलिवूडचे महानायक
2 सुशांतची आत्महत्या की हत्या? एम्सच्या डॉक्टरांनी सीबीआयकडे सोपवला अंतिम रिपोर्ट
3 ‘एक दिवस मी मोठा चित्रपट निर्माता होईन आणि…’; मेहमूद यांनी पूर्ण केला किशोर कुमारांना दिलेला शब्द
Just Now!
X