News Flash

‘ अभिजीत बिचुकलेंना हिंदी बिग बॉसमध्ये पाठवा’, असं का म्हणतोय सलमान खान

बिचुकले सर्वाधिक चर्चेत आणि तितकेच लोकप्रिय स्पर्धक ठरत आहे

छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे अर्थात बिग बॉस मराठी. सध्या बिग बॉस मराठीचं २ पर्व सुरु असून या पर्वामध्ये काही लोकप्रिय सेलिब्रिटींनी सहभाग घेतला आहे. पहिल्यांदाच  भेटणाऱ्या सदस्यांनी एकमेकांच्या सोबतीने घरात ७० दिवसांपेक्षा अधिक काळ एकत्र घालवला आहे. त्यामुळे त्यांची एकमेकांसोबत चांगलीच बॉण्डींग झाली आहे. यातून घरामध्ये एकमेकाची थट्टा-मस्करी करणं, राग-रुसवे हे ओघाओघाने येतच असतं.  या साऱ्यात अभिजीत बिचुकले अनेक वेळा अडकले जातात. मात्र त्यांच्या याच शैलीमुळे ते घरात सर्वाधिक चर्चेत आणि तितकेच लोकप्रिय स्पर्धक ठरत आहे. विशेष म्हणजे या बिग बॉस मराठीची भूरळ बॉलिवूडलाही पडली आहे. बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानने बिचुकलेंना हिंदी बिग बॉसमध्ये पाठवा, असं म्हटलं आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रोज रंगणारे डाव, स्पर्धकांमधील वादा यांवर शनिवार-रविवार होणाऱ्या विकेंडच्या डावामध्ये सूत्रसंचालक महेश मांजरेकर चर्चा करतात. वेळप्रसंगी ते घरातील सदस्यांची कानउघडणीही करतात.मात्र यावेळी त्यांना सलमान खानची साथ मिळली आहे. बिग बॉस मराठीच्या विकेंडच्या डावात सलमानची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. यावेळी त्याने प्रत्येक सदस्याविषयी त्याचं मत व्यक्त केलं असून ‘बिचुकलेंना हिंदी बिग बॉसमध्ये पाठवा’, असं त्याने म्हटलं आहे. परंतु सलमानने ही इच्छा का व्यक्त केली आहे हे मात्र गुलदस्त्याच आहे.

वाचा : Photo : गर्भवती अ‍ॅमी जॅक्सनचं टॉपलेस फोटोशूट

दरम्यान, ‘बिग बॉस मराठीचं २’ पर्व आता रंगतदार वळणावर आलं असून प्रत्येक स्पर्धक बिग बॉसची ट्रॉफी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ही ट्रॉफी मिळवण्यासाठी प्रत्येक जण टास्कमध्ये वेगवेगळ्या युक्त्या लढवून जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2019 1:08 pm

Web Title: bigg boss marathi 2 abhijit bichukle and salman khan hindi bigg boss show ssj 93
Next Stories
1 …म्हणून प्रभास करायचा नील नितिन मुकेशच्या गर्भवती पत्नीला फोन
2 ‘दिल चाहता है’च्या सिक्वलची चाहत्यांची मागणी, दिग्दर्शकांनी दिलं ‘हे’ उत्तर
3 Bigg Boss Marathi 2: विकेंडच्या डावात भाईजानमुळे येणार वेगळीच जान
Just Now!
X