बिग बॉस मराठीचं २ पर्व सुरु झाल्यापासून प्रत्येक भाग गाजवणारा सदस्य म्हणजे अभिजीत बिचुकले. घरात रोज एकावर एक टास्क रंगत असताना बिचुकलेला अचानकपणे घरातून काढता पाय घ्यावा लागला. २१ जून रोजी चेक बाऊंसप्रकरणी बिचुकलेंना बिग बॉसच्या घरातून पोलिसांनी अटक केली होती. मात्र गेल्या काही दिवसापासून बिचुकले घरात पुन्हा येणार असल्याची चर्चा रंगली होती. ही चर्चा आता प्रत्यक्षात उतरणार आहे. कारण अभिजीत बिचुकले यांचा आज घरात प्रवेश होणार आहे.
नुकत्याच झालेल्या विकेंडच्या डावामध्ये घरातील स्पर्धक माधव देवचकेला घरातून बाहेर पडावं लागलं. माधवच्या जाण्यामुळे घरातील अनेकांना धक्का बसला आहे. त्यातच नेहा आणि शिवानी प्रचंड दु:खी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र या साऱ्यामध्ये घरातील सदस्यांना एक आनंदाची बातमी मिळणार आहे. कारण, घरातून बाहेर गेलेल्या अभिजीत बिचुकलेची घरात पुन्हा एण्ट्री होणार आहे.
दरम्यान, बिचुकलेंची घरात पुन्हा एकदा एण्ट्री झाल्यानंतर घरात कोणकोणते नवनवीन बदल होणार किंवा घरात जे गृप पडले आहेत. त्या गृपपैकी बिचुकले कोणता गृप जाईन करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 29, 2019 12:46 pm