काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या ‘बिग बॉस मराठी २’ या शो प्रवास चांगल्याचं रंगतदार वळणावर येऊन ठेपला आहे. घरामध्ये नवनवीन टास्क रंगू लागले आहेत. या टास्कमध्ये काही जण एकमेकांची साथ देताना दिसतायेत तर काही जणांमध्ये वाद होताना दिसत आहेत. सध्या घरामध्ये चोर बाजार हा टास्क खेळला जात असून या खेळात घरातील स्पर्धक किशोरी शहाणे यांना अचानकपणे रडू कोसळल्याचं पाहायला मिळत आहे.

वेगवेगळे स्वभाव असणाऱ्या व्यक्तींसोबत १०० दिवस एकाच घरात राहणं सोपी गोष्ट नाही. मात्र बिग बॉसच्या घरामध्ये साऱ्याच सदस्यांना येथे रहायचं असेल तर एकमेकांच्या स्वभावाशी जुळवून घेणं भाग आहे. टास्क दरम्यान प्रत्येकच सदस्याची कसोटी लागते. हा टास्क सदस्य कसा पूर्ण करतात हे महत्वाचे असते. पण यामध्ये कधी कधी घरातील इतर सदस्य दुखावले जातात. चोर बाजार या टास्क दरम्यान किशोरी शहाणे आणि शिवानी सुर्वे मध्ये चांगला वाद झाला आणि त्यांनी शिवानीला सायको देखील म्हटले. त्यावर शिवानीने देखील उत्तर दिले “किशोरी शहाणे असतील ते त्यांच्या घरी, माझ्यासमोर आवाज नाही करायचा”

किशोरी शहाणे अगदी पहिल्या दिवसापासून सगळ्या सदस्यांशी मिळून मिसळून रहात आहेत. त्यांचा आधार घरातील बाकी सदस्यांना वाटतो आहे. पण बिग बॉस यांनी दिलेल्या चोर बाजार या टास्क दरम्यान शिवानी आणि किशोरीमध्ये वाद झाला. या टास्क दरम्यान त्याचं सामान उध्वस्त केलं, त्यांन टार्गेट केलं या गोष्टीच किशोरी शहाणे यांना खूप वाईट वाटलं. आपल्या मनात काय आहे हे त्यांनी बिचुकलेंना सांगितले.अभिजित बिचुकलेंनी किशोरीजींना धीर द्यायचा प्रयत्न केला. अभिजीत बिचुकले यावर असे देखील म्हणाले, आताच्या आता १४ सदस्यांना तुमचं काय दु:ख आहे ते सांगू आणि किशोरीजींच सामान काही असेल ते त्यांना देऊन टाका असं मी त्यांना सांगतो” मैथिलीने देखील किशोरी शहाणे यांना समजवण्याचा प्रयत्न केला.