20 October 2020

News Flash

अरोह वेलणकरला आहे तालिम व्‍यायामाचे अप्रूप

आरोह पुण्‍याच्‍या प्रसिद्ध 'तालिम व्‍यायामा'बाबत काही रोचक माहिती व टिप्‍स सांगताना दिसून आला आहे

बिग बॉस मराठीचं दुसरे पर्व आता रंगतदार वळणावर येऊन ठेपले आहे. या घरामध्ये सदस्यांनी प्रवेश करुन बरेच आठवडे लोटले आहेत. या काळामध्ये घरात अनेक घडामोडी घडल्या. अनेकांना घरातून बाहेर जावे लागले. तर आजारपणाचे कारण देऊन घरातून बाहेर पडलेल्या शिवानी सुर्वेची घरात एण्ट्री झाली. त्यानंतर आता घरात पुन्हा एकदा वाईल्ड कार्डच्या माध्यमातून आरोह वेलणकर या नव्या सदस्याचा प्रवेश झाला आहे. त्यामुळे आता घरातले चित्र पुन्हा एकदा बदलणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान वूटच्‍या अनसीन अनदेखाच्‍या एका क्लिपमध्‍ये तो पुण्‍याच्‍या प्रसिद्ध ‘तालिम व्‍यायामा’बाबत काही रोचक माहिती व टिप्‍स सांगताना दिसून आला आहे.

अरोह, अभिजीत आणि शिव हे फिटनेस संबंधीत काही गप्पा मारत असतात. त्या दरम्यान अरोह त्या दोघांना तालिम व्यायामाबद्दल सांगत असतो. ‘या व्यायामामध्ये एका हातात कुदळ पकडून माती हजार वेळा उकरायची असते. हा व्यायाम दररोज केल्याने शरीर तंदरुस्त होते. या व्यायाम प्रकाराने ६ पॅक्स वेगरे दिसत नाहीत पण शरीरात ताकद फार असते’ असे अरोह अभिजीत आणि शिवला सांगत असतो.

‘जाम भारी व्‍यायाम आहे तो, तू तो थांबवलास आणि २ वर्षाने रेझ्युम केलास तरी तू तसाच राहशील. त्‍याने तुला ६ पॅक्‍स येणार नाही पोट हलकसे दिसते पण ताकद किंवा फिटनेस खूप मस्‍त राहतो, ताकद जाणवते!’ असे अरोह पुढे म्हणाला.

आरोह वेलणकरच्या धमाकेदार एन्ट्रीने बिग बॉसने घरच्यांना सरप्राइज दिले. आरोहच्या येण्याने बिग बॉस मराठीमध्ये नवचैतन्य दिसून येत आहे. नेहा शितोळे, माधव देवचके आणि शिवानी सुर्वे या आरोहच्या मित्रांनी तर आरोहचे आनंदाने स्वागत केलेच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 6:36 pm

Web Title: bigg boss marathi 2 aroh welankar talks about talim workout avb 95
Next Stories
1 तेलुगू चित्रपटातून आर्यन खानचं पदार्पण; प्रभास, राणा डग्गुबत्तीसोबत करणार काम?
2 इंटरनेटवर मंदिरा बेदीच्या ‘त्या’ फोटोने खळबळ, चाहते झाले घायाळ
3 ‘छत्रीवाली’ मालिकेतील विक्रमच्या ‘कबीर सिंग’ लूकची चर्चा
Just Now!
X