‘देवयानी’, ‘सुंदर माझे घर’, ‘जाना ना दिल से दूर’ यांसारख्या मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये गाजलेली अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात भाग घेतला. अभिजीत बिचुकलेसोबत सारखे होणारे वाद असो किंवा घरातील तिचं आक्रमक वागणं असो बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यापासून शिवानी चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी दिलेल्या मुलाखतीत शिवानीने अजबच खुलासा केला आहे. ‘माझ्यामुळे मेघा धाडे पहिल्या सिझनची विजेती ठरली,’ असं म्हणत शिवानीने मेघाच्या विजयाचं श्रेय घेतलं आहे.

मेघा आणि शिवानी यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. सोशल मीडिया अकाऊंटवरही या दोघींचे एकत्र फोटो पाहायला मिळतात. ‘मेघाला पहिल्या सिझनसाठी मी मार्गदर्शन केलं होतं. माझ्या मार्गदर्शनामुळे ती जिंकली. इतकंच नव्हे तर घरातील तिचे कपडे आणि एकंदर स्टाइल यांसाठीसुद्धा मीच सल्ला दिला होता,’ असं शिवानी म्हणाली.

Confusion on Virat's wicket in , KKR vs RCB match
KKR vs RCB : आऊट की नॉट आउट? अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली दिसला नाराज, जाणून घ्या काय आहे नियम?
nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा

शिवानी बिग बॉसच्या घरात पूर्ण तयारी करून आली आहे यात काही शंका नाही. तिचं स्टाइल स्टेटमेंट असो किंवा घरातील काम करणं, या सर्व बाबतीत ती स्वत:ला इतरांपेक्षा वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करतेय. ‘मला जे योग्य वाटतं ते मी बेधडकपणे बोलेन. त्याचसोबत इतरांशी काही मतभेद होत असतील तर ते सोडवण्याचाही प्रयत्न करेन. स्वयंपाकापासून स्वच्छतेपर्यंतची सगळी कामं मला येतात. त्यामुळे कोणी मला त्यावरून बोलू शकणार नाही,’ असंही ती सांगते.

मेघा धाडेप्रमाणे आता शिवानी बिग बॉस मराठीचं जेतेपद पटकावणार का आणि यात तिला मेघाची साथ मिळेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.