‘बिग बॉस मराठी २’ हा शो संपल्यानंतरही शिव ठाकरे व वीणा जगताप यांची जोडी तुफान चर्चेत आहे. चाहत्यांनाही या दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेण्यात फार उत्सुकता आहे. वीणाने नुकतंच तिच्या हातावर शिवचं नाव कोरत त्याला वाढदिवसाची भेट दिली. त्यानंतर आता शिवने तिला त्याच्या गावी नेले आहे.

शिव-वीणाच्या लग्नाला शिवच्या आईचा विरोध होता अशी चर्चा होती. बिग बॉसच्या घरातील वीणाच्या काही गोष्टी शिवच्या आईला पटल्या नव्हत्या. आता वाढदिवसाचं निमित्त साधत वीणाने त्यांची भेट घेतली आहे. या भेटीचा फोटो शिवने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ‘फायनली.. राणी मीट आपली जिजाऊ,’ असं कॅप्शन शिवने या फोटोला दिलं आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनीही कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
Amir Khan Video Supporting Congress Asking for 15 lakhs
“जर कुणाच्या खात्यात १५ लाख नसतील तर..”, म्हणत आमिर खान काँग्रेसच्या प्रचाराला उतरला? Video पाहिलात का?
Sunetra Pawar Today Meets Vijay Shivtare
बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार विजय शिवतारेंच्या भेटीला, काय झाली चर्चा?
Salman Khan was the bartender at Riddhima Kapoor wedding
रणबीर कपूरच्या बहिणीच्या लग्नात बारटेंडर होता सलमान खान; ऋषी कपूर त्याला म्हणाले होते, “तू निघ तिथून…”

https://www.instagram.com/p/B2JGuGLBkEB/

Video : शिव सांगतोय, वीणाच्या ‘या’ गोष्टी आईला खटकल्या

‘बिग बॉस मराठी २’चा विजेता शिव ठाकरे ठरला आणि वीणाने टॉप ३ पर्यंत मजल मारली होती. ‘बिग बॉस’च्या घरात असतानाच या दोघांमध्ये प्रेम फुललं होतं. पण शो जिंकण्यासाठी हा दोघांनी केलेला पब्लिसिटी स्टंट मानला जात होता. मात्र शिव-वीणा या चर्चा खोट्या ठरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहेत. शो संपल्यानंतरही हे दोघं कायम एकमेकांच्या संपर्कात असून प्रत्येक अपडेट सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना देत आहेत.