बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या आठवड्यामध्ये ‘अतिथी देवो भव:’ हे साप्ताहिक कार्य रंगलं. या कार्यामध्ये बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील काही सदस्यांनी हजेरी लावली होती. यावेळी रंगलेल्या टास्कनंतर माधव देवचकेला घराचा नवा कॅप्टन होण्याची संधी मिळाली. तर या आठवड्यामध्ये शिवला उत्तम खेळाडून म्हणून मान मिळाला. घरातील शिवचं एकंदरीतच वागण्यामुळे तो कमी कालावधीमध्ये घरातील प्रत्येकाचा आवडता व्यक्ती झाला आहे. त्यातच शिव आणि वीणा यांची चांगली मैत्री आहे. त्यामुळे या दोघांना अनेक वेळा घरात चिडवलंही जातं. त्यातच आता हिनानेही शिव आणि वीणाला चिडविण्याची संधी साधली आहे. विकेंडच्या टास्कमध्ये तिने या दोघांसाठी ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे’ हे गाणं म्हटलं आहे.

‘अतिथी देवो भव:’ आता या टास्कनंतर आता विकेंडच्या डाव रंगत असून यावेळी घरातील सदस्यांनी एकमेकांसाठी गाणी गायली. यामध्ये किशोरी शहाणेने रुपालीसाठी गाणं म्हटलं,तर वैशालीने शिव आणि अभिजीतसाठी गाणं सादर केलं. यामध्ये हिनाने मात्र शिव आणि वीणासाठी ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे’ हे गाणं म्हटलं. त्यामुळे या वेकेंडच्या डावाला वेगळीच रंगत चढल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, या गाण्याच्या कार्यक्रमानंतर घरामधील एका सदस्याला घरातल्यांचा निरोप घ्यावा लागणार आहे. या प्रक्रियेमध्ये रुपाली, वैशाली, हिना,सुरेखाताई आणि किशोरी शहाणे यांच्यापैकी एकाला घर सोडावं लागणार आहे.