16 November 2019

News Flash

जाणून घ्या, बिग बॉसच्या घरात किेशोरी शहाणे का झाल्या भावूक?

सध्या बिग बॉसच्या घरातील स्‍पर्धक एकमेकांसोबत किंवा कॅमेऱ्यासमोर प्रांजळपणे त्‍यांच्‍या आयुष्यातील गोष्टी शेअर करत आहेत.

किशोरी शहाणे

‘बिग बॉस मराठी’चा दुसरा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. घरात नवनवीन टास्क रंगत आहेत आणि जो तो आपापल्या परीने बिग बॉसचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. ‘बिग बॉस’चं घर हे अनेक गोष्टींचा खजिना आहे. घरातील स्‍पर्धक एकमेकांसोबत किंवा कॅमे-यासमोर प्रांजळपणे त्‍यांच्‍या आयुष्यातील गोष्टी शेअर करतात. ‘वूट अॅपच्‍या ‘अनसीन अनदेखा’च्‍या नवीन क्लिपमध्‍ये किशोरी शहाणे यांनी विद्याधर जोशी ऊर्फ बाप्‍पा व सुरेखा पुणेकर यांना त्यांचा सगळ्यात भावनिक परफॉर्मन्‍स सांगितला.

किेशोरीताई म्‍हणाल्या की, ”माझे बाबा ज्‍या दिवशी गेले त्‍यादिवशी माझा एका पुरस्कार सोहळ्यात परफॉर्मन्‍स होता. मला आठवतंय, ते आय.सी.यू.मध्‍ये होते. मी त्‍यांना सांगितलं की, मी तुमच्‍यासोबतच राहणार आहे. पण, ते मला म्‍हणाले की, ‘द शो मस्‍ट गो ऑन!’ तू जा आणि परफॉर्म कर. मी त्‍यांचं ऐकलं आणि ज्‍या दिवशी माझे बाबा गेले त्‍याच दिवशी मी परफॉर्म केलं!”

बाप्‍पा व सुरेखा ताई हे ऐकून थक्‍क झाले. किशोरीताई पुढे म्‍हणाल्या, ”सगळ्यांना वाटलं होतं की माझा परफॉर्मन्‍स होणार नाही. पण, मी बाबांच्या सांगण्यावर परफॉर्म केलं.” सचिन पिळगांवकर यांना त्यादिवशी पुरस्कार मिळाला होता. त्यांनी स्टेजवर असं सांगितलं की, “एक कलाकार म्हणून ‘शो मस्ट गो ऑन’ याचा अर्थ काय असतो हे किशोरीने दाखवलं.” आज बाबांना जाऊन दोन वर्ष होतील तरी तो दिवस माझ्या कायम लक्षात आहे.

First Published on June 19, 2019 6:17 pm

Web Title: bigg boss marathi 2 kishori shahane emotional djj 97
टॅग Bigg Boss Marathi