News Flash

Bigg Boss Marathi 2 : महेश मांजरेकर यांच्यासोबत रंगणार WEEKEND चा डाव

पहिल्या दिवसापासून हा शो चांगलाच रंगला आहे

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसापासून हा शो चांगलाच रंगला आहे. पहिल्या दिवसापासून या घरात भांडण असो वा घरामध्ये झालेले टास्क असो सगळ्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता WEEKEND चा डाव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या WEEKEND च्या डावामध्ये सूत्रसंचालक महेश मांजरेकर घरातल्या सदस्यांशी चर्चा करणार आहेत. यावेळी घरात झालेले वाद यावर ते चर्चा करतील.

घरामध्ये अभिजित बिचुकले यांचे सदस्यांशी झालेले वाद, परागचे शिवानी, विणा, अभिजित केळकर यांच्याशी झालेले भांडण, शिवानीचा विणा आणि शिवबरोबर झालेला वाद, पराग आणि वैशाली म्हाडेमध्ये टास्क दरम्यान उडालेली वादाची ठिणगी, पहिली नॉमिनेशन प्रक्रिया, पहिला कॅप्टन कोण होईल याबद्दलची उत्सुकता तर अभिजित बिचुकले यांचे रडणे, सवाल ऐरणीचा या टास्क दरम्यान अभिजित केळकर आणि रुपाली भोसले यांचे भावूक होणं वा याच टास्क दरम्यान विद्याधर जोशी – सुरेखा पुणेकर तर अभिजित केळकर – किशोरी शहाणे यांचा डान्स सगळ्याच घटनांनी चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे या साऱ्यावर WEEKEND च्या डावामध्ये चर्चा होणार आहे.

घरात रंगलेली अंताक्षरी असो वा डान्स असो वा दिगंबर नाईक यांनी सादर केलेली सुंदर कविता. बिग बॉस मराठी सिझन २ चा पहिला सिझन धडाक्यात सुरु झाला आणि बघता बघता पहिला आठवडा संपत देखील आला. आता वेळ आली आहे या घरातील सदस्यांनी केलेल्या वर्तणुकीचा, कामाचा आढावा घेण्याची. हा आठवडा कसा गेला ? कोण चुकलं ? कोण बरोबर होत ? जे चुकले त्यांना मार्गदर्शन करण्याची आणि जे अजूनही घरामध्ये असून नसल्यासारखे आहेत त्यांना जाग करण्याची. म्हणजेच वेळ आली आहे WEEKEND चा डावची जो रंगणार आहे महेश मांजरेकर यांच्यासोबत रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2019 1:30 pm

Web Title: bigg boss marathi 2 mahesh manjrekar weekend cha daaw
Next Stories
1 मेजर डी.पी.सिंह यांनी २० वर्षांनी पाहिला ‘सरफरोश’, आमिर झाला भावूक
2 शाहरुखने पूर्ण केली चाहतीची ‘मन्नत’
3 पराग कान्हेरेनं टीमच्या विरोधात जात सुरेखा पुणेकरांना दिला पाठिंबा
Just Now!
X