News Flash

Bigg Boss Marathi 2 : नेहासाठी ‘या’ व्यक्तीला मिळाली घरात एण्ट्री

या व्यक्तीला पाहून नेहा आश्चर्यचकित झाली आहे

बिग बॉस मराठीचं दुसरं पर्व सुरु होऊन आता ६६ दिवस उलटले आहेत. या घरामधील स्पर्धकांनी अनेक नवी नाती जोडली. मात्र खऱ्या आयुष्यातील नाती मनाशी घट्ट कवटाळून हे स्पर्धक येथे खेळत आहेत. आपली हक्काची माणसं आपल्यापासून कोसो दूर असताना, त्यांच्याशी न बोलता, न भेटता, कुठल्याही प्रकारचा संपर्क न ठेवता घरातील प्रत्येक स्पर्धक बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मनामध्ये आपल्या घरातल्यांना भेटण्याची सुप्त इच्छा त्यांनी बाळगली आहे. त्यातच आता नेहाला तिच्या पतीला भेटण्याची संधी मिळणार आहे.

घरामध्ये सतत चर्चेत राहणारी स्पर्धक नेहा गेल्या काही दिवसांपासून शांतपणे वावरत आहे. त्यातच तिला अनपेक्षितपणे तिचा नवरा अर्थात नचिकेत भेटायला येणार आहे. विशेष म्हणजे नचिकेतची एण्ट्री खास होणार असून “सुखा सुखी घेता घास… ठसका लागे, अडके श्वास… जो पाणी होऊनी येई त्यास सखा जिवाचा मानावा” या ओळींनी म्हणत नचिकेत घरात प्रवेश करणार आहे. त्यामुळे आता नचिकेत भेटल्यानंतर नेहाची रिअॅक्शन काय असेल, त्या दोघांमध्ये काय बोलणं होईल हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 4:55 pm

Web Title: bigg boss marathi 2 neha shitole bigg boss house new person entry ssj 93
Next Stories
1 Photos : राज कपूर यांच्या नातवाचा साखरपुडा
2 ”तो माझ्या आयुष्यातला सर्वांत वाईट काळ”; ब्रेकअपबद्दल परिणीतीचा खुलासा
3 लक्ष्मी-नारायण यांचा अलौकिक विवाह सोहळा!
Just Now!
X