‘बिग बॉस’ मराठीच्या २ पर्वामध्ये घरात विविध टास्क रंगताना पाहायला मिळत आहेत. त्यातच आता घरामध्ये ‘एक डाव धोबीपछाड’ हे साप्ताहिक कार्य देण्यात आलं आहे. या टास्कमध्ये दोन टीम करण्यात आल्या असून दोन्ही टीम प्रतिस्पर्धी टीमला हरविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्यांनी विविध योजनादेखील आखली आहे.
‘एक डाव धोबीपछाड’ या टास्कमध्ये एका टीमला दुसऱ्या टीमच्या मॅनेजरकडून त्या टीमने तयार केलेले कपडे Approve करून घ्यायचे आहे. त्यानंतर हे धुतलेले कपडे वाळवल्यानंतर त्याला इस्त्री करून ठेवायचे आहेत. मात्र हे माहित असतानादेखील शिव प्रतिस्पर्धी टीमची इस्त्री चोरतो. आता ही इस्त्री प्रतिस्पर्धी टीम परत मिळवू शकेल का हा प्रश्न आहे.
तर दुसरीकडे नेहा या टास्कमध्ये थोडीशी चिडलेली दिसून येत आहे. रागाच्या भरामध्ये तिचे आणि शिवचे मतभेद होताना पाहायला मिळत आहेत. त्यातच तिने आता घरातील एका सदस्याला टीम ब्रेकर म्हटलं आहे. आता नेहा नक्की कोणाला टीम ब्रेकर म्हणाली आहे हे आज रंगणाऱ्या भागातच पाहायला मिळणार आहे.
First Published on June 20, 2019 4:42 pm