17 January 2021

News Flash

Bigg Boss Marathi 2 : नेहाच्या टास्क खेळण्याविषयी तिचा नवरा म्हणतो…

१०० दिवस चालणाऱ्या या शोला आता ३० दिवस पूर्ण होत आले आहेत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरत असलेला बिग बॉस मराठी २ या शोची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. घरातील प्रत्येक स्पर्धक या ना त्या कारणामुळे चर्चेत येत असतात. या घरामध्ये सर्वाधिक चर्चा असते ती म्हणजे पराग कान्हेरे, नेहा शितोळे, वैशाली म्हाडे आणि वीणा जगताप यांची. या साऱ्यांमध्ये नेहा कायमच रोकठोक आणि स्पष्टपणे तिचे विचार मांडत असते. तिच्या या स्वभावामुळे अनेक वेळा घरामध्ये वादही होतात. घरामध्ये सतत चर्चेत राहणारी नेहा तिच्या टास्क खेळण्याच्या पद्धतीमुळेही तितकीच ओळखली जाते. तिची ही पद्धत अनेकांना आवडतेदेखील. यातच नेहाच्या नवऱ्यानेदेखील त्याचं मत मांडलं आहे.

१०० दिवस चालणाऱ्या या शोला आता ३० दिवस पूर्ण होत आले आहेत. त्यातच आता या कार्यक्रमाची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. टास्क आणि नॉमिनेशनच्या या चुरसपूर्ण स्पर्धेमध्ये स्पर्धकांच्या मानसिकतेचा आणि बुद्धीकौशल्याचा कस लागतो आहे. ज्यात ‘नेहा शितोळे’ ही स्पर्धक सर्वांमध्ये वरचढ ठरत असल्याचं दिसून येतं. विशेष म्हणजे तिचं हे यश तिच्या नवऱ्याला नचिकेतला आवडत असून तिला तिचा सार्थ अभिमान वाटत असल्याचं त्याने म्हटलं आहे.

“नेहा माझी बायको आहे म्हणून मला तिचा अभिमान वाटतोय असं नाही, तर ती एक लढवैय्या खेळाडू, स्पर्धक आहे, म्हणून मला तिचा अभिमान वाटतो. घरात चाललेल्या कोणत्याही राजकारणात न पडता तिने आपला संपूर्ण फोकस केवळ खेळावर ठेवला आहे, याचं मला कौतुक वाटतं”,असे नचिकेत म्हणाला.

नुकत्याच झालेल्या विकेंड चा डाव मध्ये महेश मांजरेकर यांनी नेहाची प्रशंसा देखील केली, तसेच ‘स्टार ऑफ दि वीक’ चा किताबही तिला बहाल केला. यात गेल्या आठवड्यात घराबाहेर गेलेल्या विद्याधर जोशी ऊर्फ बाप्पाला मिळालेल्या विशेष अधिका-याद्वारे त्याने नेहाला या आठवड्यात सेफ करत वाढदिवसाची भेट तिला देऊ केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 3:59 pm

Web Title: bigg boss marathi 2 neha shitolle husband say about neha ssj 93
Next Stories
1 ‘तारक मेहता..’मधील बबीता गेली टप्पूसोबत फिरायला
2 Bigg Boss Marathi 2: हिना-परागमध्ये पुन्हा पडणार वादाची ठिणगी!
3 ‘अर्जुन रेड्डी’ फेम विजय देवरकोंडा या अभिनेत्रीला करतोय डेट?
Just Now!
X